मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी धर्म बदलल्याचा दावा केला आहे. मलिक यांचा हा दावा समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी फेटाळून लावला आहे. आम्ही धर्मांतर केलं नाही, असं सांगत क्रांतीने त्यांच्या लग्नाचा फोटोही पोस्ट केला आहे.
क्रांती रेडकर यांनी ट्विट करून नवाब मलिक यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं होतं. 2016मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमचं लग्न हिंदू मॅरेज अॅक्टनुसार 2017मध्ये झालं होतं, असंही क्रांतीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
क्रांती रेडकरने दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिला फोटो लग्नाचा आहे. या फोटोत समीर वानखेडे क्रांतीच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. तर, दुसरा फोटोही लग्नाचाच असून लग्न झाल्यानंतरचा हा फॅमिली फोटो आहे.
वानखेडे यांचा जन्म दाखला पोस्ट कर मलिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. समीर यांनी धर्मांतर केल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असं मलिक यांनी म्हटलं होतं. समीर दाऊद वानखेडेनी अटक करू नये यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अस म्हटलं. पण एखादा प्रामाणिक अधिकारी असता तर समोर जाऊन चौकशी करा म्हटलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.
Me n my Husband Sameer r born Hindus.We hv never converted to any other religion.V respect all religions.Sameer’s father too is hindu married to my Muslim Mom in law who is no more.Sameer’s ex-marriage ws under special marriage act,divorced in 2016.Ours in hindu marriage act 2017 pic.twitter.com/BDQsyuvuI7
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 25, 2021
संबंधित बातम्या:
समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?
प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?
Eknath Khadse Bail | एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर
(Sameer Wankhede’s Wife Kranti Redkar Tweets Wedding Photo, Hits Back At Nawab Malik)