MNS Sandip Deshpande : संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव; अटक टळणार?

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी या धरपकडीदरम्यान पोलिसांना गुंगारा दाऊन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला कर्मचारी जमिनीवर कोसळल्याचेही दिसून आले. याच प्रकरणात आता संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांनी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

MNS Sandip Deshpande : संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव; अटक टळणार?
संदीप देशापांडेंची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनाच कोर्टानं झापलं, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याची टिप्पणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 6:56 PM

मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्याबाबत घेतली भूमिका (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक होताना गेली काही संपूर्ण देश पाहत आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपसहीत काही हिंदू संघटनांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काहींनी या भूमिकेला कडाकडून विरोध केला आहे. राज ठाकरेंची औरंगाबादेतली सभा आणि ईद झाल्यावर मनसेकडून आणकी आक्रमकतेने हा नारा देण्यात आला. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसे नेत्यांची धरपकड सुरू केली होती. याच दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारण मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी या धरपकडीदरम्यान पोलिसांना गुंगारा दाऊन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला कर्मचारी जमिनीवर कोसळल्याचेही दिसून आले. त्यानंतर पोलिसांना गुगारा दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांनी यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

कोर्टात दिलासा मिळणार?

या व्हिडिओ नंतर बराज राजकीय गदारोळ माजला होता. महाविकास आघाडी आणि खासकरून शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून मनसेवर टीकेची झोड उडवली होती. त्यामुळे पोलिसांनी यात पुन्हा त्यांच्या गुन्हा दाखल केला आणि त्यांची शोधाशोध पोलिसांकडून सुरु होती. अशातच आता हे कोर्टात जामिनासाठी धाव घेत असल्याने कोर्टात त्यांना दिलासा मिळणार आणि संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांचा जामीन मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम

तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणार विरोधही काय आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या एका नेत्याकडून विरोध होतोय. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मला पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातून मुस्लिम आणि मराठी माणसांचे फोन येत आहेत. आज दुपारी मनसे कार्यलयातूनही मला फोन आला होता, मात्र मी घेतला नाहीये, असा दावाही त्यांनी केला आहे. तर आता राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी 5 तारखेला राज ठाकरेंना अयोध्यात येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.  कारण ती वेळ आता निघून गेलीय, आता राज ठाकरेंना दौऱ्याची तारीख बदलावी लागेल,  मला कुणाशी काही घेणं देणं नाही, माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.