संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा; मनसेच्या नेत्याच्या मागणीने खळबळ

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात मनसेच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मनसे नेते अमेय खोपकर यांनीही संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा; मनसेच्या नेत्याच्या मागणीने खळबळ
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:31 AM

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. मात्र, शिवाजी पार्क सारख्या वर्दळीच्या परिसरात हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता या हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मनसेने केली आहे. मनसेने थेट या हल्लाप्रकरणात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे संशयाची सुई नेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात मनसेच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मनसे नेते अमेय खोपकर यांनीही संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रातील चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. संदीप देशपांडे वारंवार पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना विनंती आहे की त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घ्यावं. त्यांची चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांनी अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. त्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले होते. त्यावर, कोण आहेत संदीप देशपांडे? कोण आहेत ते? कुठे असतात ते? कोणत्याही नागरिकावर हल्ले होणं हे चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही. सामान्य माणूस असेल किंवा राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला होणं योग्य नाही. हे सनसनाटी करण्यासाठी करत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात. त्यामुळे हल्लेखोरांना बळ मिळतं, असा टोला त्यांनी लगावला.

संदीप देशपांडे यांचा आरोप काय?

संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे संदीप देशपांडे हे घरी आले आहेत. घरी जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आमच्यावर हल्ला केला तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

राज ठाकरेंकडून विचारपूस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज हिंदुजा रुग्णालयात जाऊन संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संदीप देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.