AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल, नवी मुंबई एपीएमसीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजारात (New Mumbai APMC Market) निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल, नवी मुंबई एपीएमसीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 7:05 AM

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजारात (New Mumbai APMC Market) निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आज भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल अर्थात निर्जंतुकीकरण यंत्र बसविण्यात आलं. बाजारात जाणारी प्रत्येक व्यक्ती या टनेलमधून प्रवेश करेल. त्यामुळे भाजीपाला बाजारात कोरोना विषाणूंचा प्रसार कमी होईल, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई एपीएमसीचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी दिली (New Mumbai APMC Market).

नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दर दिवसात हजारोंच्या संख्येने माथाडी कामगार, व्यापारी, ग्राहक ये-जा करतात. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या यंत्रामुळे कोरोना विषाणूंचा फैलाव कमी होईल, अशी प्रतिक्रिया भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली आहे.

बाजारात गर्दी होऊ नये यासाठी बाजारसमिती प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. प्रशासनाने याआधी गाड्यांवर फवारणी, बाजाराबाहेर 500 मीटरपर्यंत बॅरिकेट, बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, मास्क आदी उपायोजना केल्या आहेत. आता एपीएमसी प्रशासनातर्फे नवीन यंत्र आजपासून बाजाराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलं आहे.

बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल बसवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती या टनेलमधून प्रवेश करुन बाहेर पडेल. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात हा पहिला उपक्रम बाजार समितीतर्फे राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे यंत्र प्रामुख्याने इटली, चीनसह अन्य काही विकसित देशांमध्ये आहे.

सध्या एपीएमसी अधिकारी, पोलिस, आरोग्य, महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य तपासणी तथा तत्सम कामे करीत आहे. हायरिस्क झोनमधून परतल्यानंतर त्यांना निर्जंतुक करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरु शकणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

आत्ता लोकांचे जीव वाचवणं गरजेचं, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची मोदींकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, परिवहन मंत्र्यांची घोषणा

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.