मैं पुछना चाहता हुँ, फडणवीसांचं थेट नाव घेत राऊतांचा 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, घेरलं?

पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊत यांनी राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला.

मैं पुछना चाहता हुँ, फडणवीसांचं थेट नाव घेत राऊतांचा 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, घेरलं?
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 5:01 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनातून भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. राऊत यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद पाहत आहेत. मी इथूनच त्यांना नमस्कार करतो. नुकताच त्यांचा फोन येऊन गेला, शरद पवार यांचाही काही वेळापूर्वी फोन आला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन मला येऊन गेले. त्या सगळ्यांनी या पत्रकार परिषदेसाठी, मला आशीर्वाद दिले आहेत, असं राऊत म्हणाले.

या पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊत यांनी राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. त्यानंतर राऊतांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे वळवला. राऊत यांनी फडणवीसांचं थेट नाव घेत तब्बल 25000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा तब्बल 25000 कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यंना कुठं लपवलंय ते त्यांनी सांगावं. महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं, सर्वांचे अकाऊंट्स, त्यांच्या लिंक्स, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटं दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात इओडब्लू आणि ईडीकडे दिली जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला.”

‘..तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील!’

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, “भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीनदा भेटले. वारंवार मला हेच सांगितलं की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचं. आमची सगळी तयारी झालेय. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटलं हे कसं शक्य आहे? याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील! टाईट करतील हा शब्द त्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.”

इतर बातम्या

Sanjay Raut: किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा, राऊतांची मागणी, नेमके आरोप काय?

Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भडवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली

Sanjay Raut Press Conference : भाजप-ईडीवर तुटून पडण्यापूर्वी राऊतांना कुणा कुणाचा फोन? राऊतांनी ‘बाप’ काढत नावं सांगितली

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.