23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?

Varsha Raut Property : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP) आणि त्यांच्या पत्नीच्या नावे नेमकी किती संपत्ती आहे?

23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?
वर्षा संजय राऊत यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 1:10 PM

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा संजय राऊत (Varsha Raut) यांना ED ने नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून (PMC Bank Scam) संजय राऊतांच्या (Sanjay Raut) सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस (ED Notice) पाठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र संजय राऊत यांनी अद्याप आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलंय. “अजून ईडीची नोटीस मिळालेली नाही. कदाचित नोटीस भाजप कार्यालयात अडकली असेल. माझा माणूस मी भाजप कार्यालयात पाठवला आहे, ईडीची नोटीस कालपासून शोधत आहे”, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut and Varsha Raut Property detail ED Notice cash, land, bond, shares)

नुकतं भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर लगेचच संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांनाही नोटीस आल्याचं वृत्त आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वर्षा राऊत यांना नोटीस येण्यासाठी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातील व्यवहाराचं कारण दिलं जात आहे. यानिमित्ताने संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे नेमकी किती संपत्ती आहे? याबाबतही चर्चा सुरु झाली आहे.

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीच्या विवरणासह प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. 2016 मध्ये संजय राऊत पुन्हा एकदा राज्य सभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे हे संपत्तीचं विवरण दिलं होतं. त्या विवरणानुसार –

Sanjay Raut Property_Varsha Raut

संजय राऊतांची संपत्ती नेमकी किती?

संजय राऊत यांनी 24 मे 2016 रोजी निवडणूक आयोगाकडे संपत्ती विवरण सादर केलं होतं. त्यानुसार संजय राऊत आणि वर्षा राऊत या दाम्पत्याकडे जवळपास 15 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता होती.

24 मे 2016 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्या हातात 19 हजार 271 रुपयांची रोकड होती. तर पत्नीकडे 38 हजार 288 रुपये हातात होते. मुलगी पूर्वशीकडे 25 हजार तर लहान मुलगी विधीताच्या हातातील रक्कम 500 रुपये दाखवण्यात आले होते.

संजय राऊतांनी त्यावेळी वेगवेगळ्या बँकांमधील डिपॉझिट, मुदत ठेवी, नॉन बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक दाखवली होती. यामध्येच PNB बँकेचा उल्लेख आढळतो. पत्नीच्या नावे PNB बँकेत जवळपास 5 खात्यांची नोंद विवरणपत्रात आहेत. तर पालघर, अलिबागमध्ये राऊत यांच्या पत्नीच्या नावे जमिनी असल्याची नोंद आहे.

वर्षा राऊत यांच्याकडे जवळपास 23 लाख रुपयांचे दागिने असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये 21 लाख 87 हजार 900 रुपयांचे सोन्याचे दागिने तर 1 लाख रुपये किमतीची चांदी असल्याचं म्हटलं आहे.  

Sanjay Raut Property details

राऊत कुटुंबाच्या कोणत्या बँकेत किती ठेवी?

संजय राऊत यांच्या नावे –

  • बँक ऑफ इंडिया – 47 हजार 663
  • स्टेट बँक (दिल्ली) – 1 लाख 53 हजार 280
  • स्टेट बँक (परेल) – 4 लाख 17 हजार 196
  • सारस्वत बँक – 1 लाख 79 हजार 186
  • प्रबोधन प्रकाशन कर्मचारी सोसायटी – 49,976
  • FD प्रबोधनकार पतपेढी – 50,000
  • RD प्रबोधनकार पतपेढी – 16,450
  • अन्य शेअर्स गुंतवणूक, विविध मुदत ठेवी

Sanjay Raut Property details

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावे –

  • PNB भांडूप शाखा – 2 लाख 55 हजार 589
  • PNB दुसरं अकाऊंट – 50,000
  • PNB तिसरं अकाऊंट – 2,34,780
  • PNB चौथं अकाऊंट – 50,000
  • PNB पाचवं अकाऊंट – 50,000-
  • जनकल्याण बँक, अकाऊंट 1 – 2 लाख 01 हजार 080
  • जनकल्याण बँक, अकाऊंट 2 – 1 लाख
  • जनकल्याण बँक, अकाऊंट 3 – 1 लाख
  • म्युनिसिपल बँक – 49 हजार 099
  • कुर्ला नागरिक बँक – 60,584
  • कुर्ला नागरिक बँक (AC 7229/1) – 8,282
  • कुर्ला नागरिक बँक (AC 829/1) – 8,158
  • कुर्ला नागरिक बँक 8382/2 – 8,353
  • प्रबोधनकार पतपेढी खाते 147 – 50,000
  • प्रबोधनकार पतपेढी खाते 158 – 50,000
  • प्रबोधनकार पतपेढी खाते 159 – 50,000
  • प्रबोधनकार पतपेढी खाते 180 – 50,000
  • प्रबोधनकार पतपेढी खाते 181 – 50,000
  • पद्मावती पतपेढी – 36,600

संजय राऊत

पैसे, शेअर्स, दागिने – १ कोटी ७५ लाख १९ हजार ९९९

वर्षा राऊत

पैसे, शेअर्स, दागिने -५१ लाख २३ हजार ६२१

पूर्वशी राऊत

पैसे, शेअर्स, दागिने – ३ लाख ३९ हजार ५१०

विधीता राऊत

पैसे, शेअर्स, दागिने – ३९ हजार ९१२

संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या जमिनी, स्थावर मालमत्ता किती?

  • संजय राऊत – ४ कोटी ८१ लाख ४८ हजार
  • वर्षा राऊत – ७ कोटी १० लाख ८९ हजार ————————-

संजय राऊत यांची एकूण संपत्ती –

जंगम – 1  कोटी 75 लाख 19 हजार 999 स्थावर – 4 कोटी 81 लाख 48 हजार एकूण – 6 कोटी 56 लाख 67 हजार 999

पत्नी वर्षा यांची एकूण संपत्ती –

  • जंगम – 51 लाख 23 हजार 621
  • स्थावर – 7 कोटी 10 लाख 89 हजार
  • एकूण – 7 कोटी 62 लाख 12 हजार 621 ——————————–

संजय राऊत आणि वर्षा राऊत या दोघांची मिळून एकूण संपत्ती

  • संजय राऊत – 6 कोटी 56 लाख 67 हजार 999
  • वर्षा राऊत – 7 कोटी 62 लाख 12 हजार 621
  • एकूण – 14 कोटी 18 लाख 80 हजार 620

संजय राऊत यांनी हे सर्व उत्पन्न त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग, ADR या वेबसाईटवर हे तपशील उपलब्ध आहेत. हे उत्पन्न 2016 नुसार आहे. सध्याच्या दरानुसार यामध्ये अर्थातच बदल असेल.

संबंधित बातम्या   

Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर   

चोरी केली तर हिशेब द्यावाच लागेल, सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल सुरुच 

(Sanjay Raut and Varsha Raut Property detail ED Notice cash, land, bond, shares, Varsha Raut profile)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.