Sanjay Raut : ताई माई अक्का अन् तुमचा पक्ष छ… संजय राऊत यांचा कुणाला खोचक टोला?

Sanjay Raut Attack on Government : सध्या राजकारणात याला गाड, त्याला गाडचा नारा देण्यात आला आहे. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी बाह्यावर केल्या आहेत. त्यातच संजय राऊत यांनी पण खोचक टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा धरला आहे.

Sanjay Raut : ताई माई अक्का अन् तुमचा पक्ष छ... संजय राऊत यांचा कुणाला खोचक टोला?
संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 10:48 AM

सध्या राज्यात रोखठोक राजकारण सुरु आहे. वाकड्यात गेले तर ठोक भाषा करण्यात येत आहे. याला गाड, त्याला गाडच्या या नाऱ्याने राजकारण ढवळून निघाले आहे. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. दोन्ही पक्षांनी बाह्या वर केल्या आहेत. त्यातच संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा धरला आहे. त्यांनी अत्यंत जहरी टीका केली आहे.

काय म्हणाले राऊत

माझं तोंड वाईट आहे. ताई माई अक्का, तुमचा पक्ष छक्का अस होऊ नये म्हणजे झालं, अशी जहरी टीका त्यांनी केली. पाठीत खंजीर खुपसयन्याच काम मोदी शाह यांनी केलं आहे, हे ते म्हणाले. हे औट घटकेचे सरकार आहे. नागपूरमध्ये फडणवीस यांचा पराभव होणार हे नक्की आहे. किती योजना घोषित केल्या तरी काही होणार नाही. नागपूर हा काय सातबारा आहे का त्यांच्या नावावर 7 तारखेला उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. मुंबईत बैठक कोणी ठरवली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

संसद गळतीप्रकरणावरुन थेट हल्ला

सेंट्रल व्हिस्ता मोदी आणि शाह यांच्या ठेकेदारांनी ही वास्तू बनवली आहे ती खचत आहे. देशभरात त्यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वस्तूंना अल्प काळात तडे जात आहेत. यात किती कमीशनबाजी झालीय हे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात समृद्धी, अटल सेतू याही वस्तू आहेत. संसदेची ऐतिहासिक इमारत उभी असताना तिथं पाणी भरलं आहे. अयोध्येच्या राम मंदिराला देखील गळती लागली आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे हा उद्योग आहे, त्यामुळेच असे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे ?

संसदेत अशी अवस्था असेल तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नयेत हा साधा सवाल आहे मुंबई पालिकेत लोकनियुक्त राज्य नसल्यामुल अवस्था काय आहे ते बघा. दिल्लीत LG कडे सगळी सत्ता आहे, केजरीवालांना तुरुंगात टाकल आहे. सभागृहात जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्यांना आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आम्ही गुन्हेगार होतोय. काल सपाच्या खासदारांने संघाशी निगडीत प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला, राज्यसभा सभापती यांनी काय भूमिका घेतली हे पहा असे ते म्हणाले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.