कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय: संजय राऊत

आता मी माझा माणुस पाठवला आहे भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लागवला आहे. (Sanjay Raut criticize BJP over ED)

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय: संजय राऊत
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 10:38 AM

मुंबई:शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कालपासून ईडीचे कोणीच आले नाही असं सांगितले. राऊत त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याप्रकरणी  बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपला टोला लगावला. “आता मी माझा माणूस भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लागवला आहे. हे सर्व राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करुद्या, असंही ते म्हणाले. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut criticize BJP over ED Notice to his Wife)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली आहे. कुणात किती ताकद आहे हे पाहूच असं ट्विट करत त्यांनी ईडीला आणि मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे आव्हानच दिलं.  मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी उघडउघड भाजप आणि मोदी सरकारवर टीका केल्यानेच ही ईडीची नोटीस पाठवल्याचा आरोप शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.

संजय राऊत यांनी हिंदीमध्ये ट्विट करत म्हटलं, “आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया”. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संजय राऊत यांचे ट्विट:

वर्षा राऊत यांना नोटीस का?

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

संजय राऊत यांचा पत्रकारांशी संवाद

संबंधित बातम्या:

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

(Sanjay Raut criticize BJP over ED Notice to his Wife)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.