वेस्टर्न ड्रेस, केक कटिंगसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, राऊतांच्या लेकीचा ‘ग्रँड साखरपुडा’

आता राजकीय नेते आणि इतर मंडळींसाठी सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते. (Sanjay Raut daughter Engagement Celebration)

वेस्टर्न ड्रेस, केक कटिंगसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, राऊतांच्या लेकीचा 'ग्रँड साखरपुडा'
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 11:42 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कन्येच्या साखरपुड्याचे ग्रँड सेलिब्रेशन मुंबईत पार पडले. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा दुपारी पार पडला. त्यानंतर आता राजकीय नेते आणि इतर मंडळींसाठी सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते. (Sanjay Raut daughter Engagement Celebration)

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिने या सेलिब्रेशनच्या वेळी जांभळा रंगाचा लेहंगा घातला होता. तर जावई मल्हार याने काळ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला होता. या सेलिब्रेशनदरम्यान केकही कापण्यात आला. या केकवर PM असे लिहिण्यात आले आहेत.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली. तसेच रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि राऊत यांनी गळाभेट घेतली. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळाच रंग चढला होता.

संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला अनिल देसाई,अरविंद सावंत, दिवाकर रावते, नवाब मलिक उपस्थित होते.
त्याशिवाय एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, भाऊ शेवाळे, प्रवीण दरेकर, छगन भुजबळ, मंगल प्रभात लोढा, भाजपा खासदार मनोज कोटक, जितेंद्र आव्हाड, कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा 

आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. साखरपुडा होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते. (Sanjay Raut daughter Engagement Celebration)

पांरपारिक पोषाख

साखरपुड्यासाठी पूर्वशी आणि मल्हार खास मराठमोळ्या वेषात आले होते. पूर्वशी यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांनी हातात शेला धरला होता. तर मल्हार हे पेशावाई पेहरावात आले होते. तर, संजय राऊत आणि राजेश नार्वेकर यांनी कुर्ता, सदरा परिधान केला होता. साखरपुड्यासाठीचा स्टेज अत्यंत साधा, पण आकर्षक करण्यात आला होता. श्रीगणेशाच्या आकृतीच्या पृष्ठभूमीवर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नमय झालं होतं.

आकर्षक निमंत्रण पत्रिका

राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्यानिमित्ताने आकर्षक निमंत्रण पत्रिका छापली होती. गुलाबी रंगाची ही निमंत्रण पत्रिका अधिकच उठावदार दिसत होती. पूर्वशी यांच्या नावातील अद्याअक्षर असलेलं ‘पी’ आणि मल्हार यांच्या नावातील ‘एम’ हे अद्याक्षर घेऊन ‘पीएम’ असा ठळक उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिका उघडताच ‘पीएम’ ही अद्याक्षरे सर्वांची लक्ष वेधून घेतात. त्यानंतर वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची नावे दिसतात. नंतर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं असून त्यांचा साखरपुडा होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर मल्हार यांच्या मातोश्री सीमा आणि वडील राजेश नार्वेकर यांची नावे आहेत. नंतर साखरपुड्याची तारीख आणि स्थळ देण्यात आलं आहे. तसेच निमंत्रकांमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, संदीप राऊत आणि सविता राऊत यांची नावे छापण्यात आली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे चिरंजीव

मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांचे वडील राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. नार्वेकर हे कर्तव्यदक्ष आणि मितभाषी अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.  (Sanjay Raut daughter Engagement Celebration)

संबंधित बातम्या : 

Photos : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी

संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.