Sanjay Raut : ‘एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर…’ राऊतांची सोमय्यांचं नाव न घेता टीका

प्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या जखमांवर सवाल उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut : 'एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर...' राऊतांची सोमय्यांचं नाव न घेता टीका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:36 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या (Sanjay Raut on Kirit Somaiya) यांच्यावर टीका केली. शनिवारी झालेल्या हल्ल्यात किरीट सोमय्यांना यांना झालेल्या हल्ल्यावरुन आधीच शंका उपस्थित केली जात होती. आता मात्र संजय राऊत यांनी तर थेट सोमय्यांच्या जखमेवरुन (Injured of Somaiya) खोचक टोला लगावला आहे. एखादा माथेफिरु वेडा, स्वतःवर हल्ला झाला, म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट (President Rule) लागी करा, असं सांगत असेल, तर त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करावं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच विरोधी पक्ष स्वतःच्या हातातली घंटा वाजवत बसली आहे. आमच्या हातातली गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायचची तेव्हा आपटेल, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपच्या नेत्यांनी इशाराही दिलाय. ते मुंबईत पत्रकारांशी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

पाहा व्हिडीओ :

ओठाखाली सॉस होता?

यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या नावाचा कुठेच उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या जखमांवर सवाल उपस्थित केले आहेत. सोमवारी किरीट सोमय्या यांना हल्ल्यात झालेली जखम कृत्रिम होती की काय? अशी शंका घेण्यात आली होती. त्याअनुशंगानं पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास करणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आता किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यापेक्षाही चर्चा किरीट सोमय्यांना झालेल्या जखमेची होऊ लागली आहे.

तिसरा हल्ला…

याआधी सोमय्यांवर वाशिम, पुण्यातही हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत शनिवारी खार स्टेशन बाहेर नवनीत राणा यांना भेटायला आलेल्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. पुण्यातल्या हल्ल्यातही किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यानंतर आता खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ल्यातही किरीट सोमय्यांच्या हनुवटली मार लागून रक्त आलं असल्याचं दिसलं होतं.

केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी सोमवारी (25 मार्च) रोजी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यांनी आपल्यासोबत झालेल्या प्रकारासोबतच भाजपच्या नेत्यांसह सरकारविरोधात बोलणाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याची तक्रार दिली. महाराष्ट्र भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेलं होतं. त्यावेळीही सोमय्यांवर झालेला हा पोलिसांच्या मदतीनं रचलेला कट होता, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.

संबंधित बातम्या :

फडणवीसांना लोकशाहीची उबळ, त्यांची भावना समजू शकतो; संजय राऊत यांचा टोला

राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून बेल की जेल?

Sanjay Raut | त्यांना खाजवण्याची सवयच आहे, एक दिवस चमडी फाटणार.. संजय राऊतांनी काय दिला इशारा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.