Shivsena : हिंदू मतं गमावण्याची भीती? सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, राऊतांनी कारण सांगितलं

Shivsena : देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असूनही शिवसेनेने या पत्रावर सही केली नाही.

Shivsena : हिंदू मतं गमावण्याची भीती? सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, राऊतांनी कारण सांगितलं
सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाहीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:54 PM

मुंबई: देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (ncp)असूनही शिवसेनेने (shivsena) या पत्रावर सही केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवतंय. शिवसेनेकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. ही लोकांची पोटदुखी आहे. ही लोकांची वेदना आहे. आम्ही काय करायचं आणि काय नाही याबाबत आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही. काल देशातील 12 नेत्यांनी संयुक्त पत्रक काढलं. त्यावर शिवसेनेची सही नाहीये. आम्ही ठरवलं आम्हाला त्यावर सही करायची नाही. आम्हाला विचारावं लागत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेने विरोधी पक्षाच्या पत्रकावर सही का केली नाही याची कारण मिमांसा केली. आमचं आम्ही पाहू, आमची भूमिका आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सत्तेत आहोत. आम्ही आमची भूमिका आणि हिंदुत्व बाजूला ठेवलेलं नाही. आम्ही दहा मुद्दे काढले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, जातीय सलोखा कायम ठेवणं याच मुद्द्यावर राज्य चालतं. राज्य भोंगे उतरवा आणि भोंगे चढवा यावर चालत नाही. देशाचं राज्याचा विकास करणं हे जसं पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचंही कर्तव्य आहे. देशात किंवा राज्यात अशांतता निर्माण झाली असेल तर लोकांना शांत राहण्याचं आवाहन करणं जसं पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. तसंच ते मुख्यमंत्र्यांचही आहे, असं राऊत म्हणाले.

तर त्यांना जोडेच मारले पाहिजे

यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरही टीका केली. जो माणूस महाराष्ट्राच्या विरुद्ध दिल्लीत जाऊन कारस्थानं करतो, त्याला जोड्यानंच मारलं पाहिजे. ही परंपराच आहे महाराष्ट्राची. एन्ड आय रिपीट.. आणि मी शब्द मागे घेतले का? मी सॉरी बोललोय का? नाही. मी 35 वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलंय. 30 वर्ष संपादक म्हणून काम केलंय. तुम्ही जर कुणाच्या तरी सुपाऱ्या घेत असाल आणि बदनाम करत असाल, आणि महाराष्ट्राबद्दल प्रेझेंटेशन देत असाल, तर जोडेच मारले पाहिजे या सारख्या माणसांना, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री, गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये

आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत. हैदोस घातलाय. या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत. केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल. देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करावी? नवाब मलिकांची 55 लाखांची केस 5 लाखांवर आली, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जातीय हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली, पंतप्रधान मोदींच्या ‘मौन’वर प्रश्नचिन्ह

Raj Thackeray : भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता

Maharashtra News Live Update : Sanjay Raut Live : सामाजिक ऐक्य बिघडवल्यास सरकार पाऊलं उचलणार, राज ठाकरेंना राऊतांचा इशारा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.