Sanjay Raut | तर राजकारणच नाही तर पत्रकारिताही सोडेन; संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते अब की बार 400 पारचा नरा बुलंद करत आहे. त्याचा राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.

Sanjay Raut | तर राजकारणच नाही तर पत्रकारिताही सोडेन; संजय राऊत यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:22 PM

मुंबई | 1 March 2024 : देशातील परिस्थितीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लोकसभेच्या 400 जागा सहज निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी भाजपविरोधात वातावरण असल्याचे सांगत, भाजपनं किती मोठं टार्गेट समोर ठेवलंय, त्याच्या निम्म्या जागांवर भाजप निवडून येईल, असा दावा केला आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. काय म्हणाले खासदार राऊत?

तर राजकारणाचा संन्यास

  • मी कधीच शिवराळ भाषा वापरत नाही. मी असंसदीय शब्द वापरल्याचं दाखवा. मी त्याक्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडेल, असे खासदार राऊत म्हणाले. मी शिवराळ भाषा वापरत नाही. भाजपवाले काय बोलतात ते सांगा, असा टोला त्यांनी हाणला.
  • तुम्ही येतात म्हणून मी बोलतो. तुम्ही यायचं थांबला तर मी बोलायचं थांबेल. मी राजकारणी आहे. माझ्या पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी मी बोलत असतो. जेव्हा वाटेल लोक माझं ऐकत नाही, तेव्हा मी बोलण्याचं बंद करेल.

भाजप २२० वर ऑलआऊट

हे सुद्धा वाचा

मोदी पंतप्रधान होणार नाही, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं. २२०च्या पुढे भाजप जात नाही. भाजपचं सरकार येतच नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा. त्या राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील ८० जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरयाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप २२०च्या पुढे जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.

नितीश बाबुंना पळण्याचा नाद

नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. त्यांना पळण्याचा नाद असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला.  एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान २९० जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल.

देशाचं नेतृत्व कोण करेल

इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत. जागांचा विषय नाही. लीडरशीपचा विषय आहे. देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्व आहे.

मोदी गॅरंटी ही केवळ जाहिरात

मोदी गॅरंटी फक्त जाहिरातीत आहे. बाकी कुठे आहे. भाजप हा चोरांचा पक्ष आहे. भाजप हा चोरबाजार आहे. काँग्रेसने कर्नाटकात काँग्रेसच्या सहा गॅरंटी आहे. तिथून आलेला हा फॉर्म्युला भाजपने चोरला. काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या, भाजप कनार्टकात हरले. त्यामुळे मोदींना वाटलं लोक गॅरंटी शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून शब्द चोरल्याचा आरोप राऊत यांनी केला.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.