संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, चर्चेत नेमकं काय झालं?
एकत्र यावं, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
मुंबई – संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. संजय राऊत म्हणाले, काल उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून सांगितलं. आपण सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभे आहोत. ही आज राज्याची आणि काळाची गरज आहे. सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान होत आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेवरील गावांवरून हल्ला केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपमानाचा हल्ला आहे. याविरोधात एकजूट दाखवून पाणी दाखवावं. एकत्र यावं, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.
या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एक आहोत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
तर, राज्यपालांच्या विषयावर २८ नोव्हेंबरला सविस्तर बोलणार, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावर उदयनराजे आक्रमक झाले आहेत.
बोम्मईच्या वक्तव्यामागे मोठं छडयंत्र असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. राज्यपालांचा विषय़ मागे पडावा, यासाठी बोम्मईचं हे वक्तव्य असल्याचं राऊत म्हणाले. भाजपनं दिलेल्या स्क्रीप्टप्रमाणे बोम्मई बोलत आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत आगलावेपणा करू नका, असं उत्तर त्यावर आशिष शेलार यांनी दिलंय.
संजय राऊत म्हणाले, फार मोठं कारस्थान आणि छडयंत्र आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केली आहे.