VIDEO: राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही, राऊतांचा फडणवीसांना टोला

राज्यात सरकारचं अस्तित्व नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

VIDEO: राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही, राऊतांचा फडणवीसांना टोला
sanjay raut
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 1:54 PM

मुंबई: राज्यात सरकारचं अस्तित्व नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यात प्रत्येकजण स्वत: मुख्यमंत्री समजतो ही चांगली गोष्ट आहे. ही लोकशाहीची ताकद आहे, असं सांगतानाच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मात्र, कोणत्याही मंत्र्याला ते मंत्री आहेत असं वाटत नाही. एवढंच काय खासदारांनाही ते खासदार आहेत, असं वाटत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत तेव्हा पासून 11 कोटी लोकांना वाटतं मी मुख्यमंत्री आहे. मी सत्ताधारी आहे असं लोकांना वाटतं. लोकशाहीतील ही मोठी घटना आहे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला तो मंत्री आहे असं वाटत नाही. खासदार आहे असं वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांची वेदना समजू शकतो

राज्यात कायद्याचं राज्य नाही या फडणवीसांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात काय तरी द्याचं पूर्वी राज्य होतं. ते दोन वर्षापूर्वी घालून कायद्याचं राज्य आलं. त्यामुळे काही तरी द्यावाल्यांची वेदना समजू शकतो, असा चिमटा त्यांनी काढला.

बाळासाहेब असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान योद्धा होते. मराठी माणसासाठी हिंदुंसाठी ते लढवय्ये महानायक होते. त्यांचा आदर्श प्रेरणा आमच्या मनात कायम आहे. केवळ एका दिवसासाठी नव्हे तर त्यांच्या स्मृती मनात अखंड असतात. बाळासाहेब असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. नेमका कोणत्या गोष्टीला ब्रेक लागला असता हे आता मी सांगत नाही. पण ठाकरेंनी या देशाला राष्ट्रभक्तीचं हिंदू विचाराचं तेज प्राप्त करून दिलं. हिंदू या पुढे मार खाणार नाही हे बळ या देशाला देण्याचं काम त्यांनी केलं. हिंदू पळपुटा नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. मराठी माणसाच्या मनगटात चेतना जागवली, असं त्यांनी सांगितलं.

वाद निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाहीत

नकली हिंदुत्ववाद्यांकडून देशाला कसा धोका आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. त्यांचं दसरा रॅलीतील भाषण ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. निवडणुका येतात तेव्हा हे लोक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतात. भारत-पाकिस्तान वाद काढतात. निवडणूक जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत. दंगल भडकावी आणि हिंसाचार व्हावा असं या लोकांना वाटतं. हे लोकं कोण आहेत सर्वांना माहीत आहे. पार्टी प्रमुख उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना खुले आव्हान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Photo : जमलेल्या माझ्या तमाम… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक झंझावात!

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

Maharashtra News LIVE Update | देशाला भाजपची हुकूमशाही नको आहे, त्यामुळे लोकांना पर्याय हवा आहे – शरद पवार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.