‘भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि…’, संजय राऊत यांची सर्वात खोचक टीका

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली.

'भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि...', संजय राऊत यांची सर्वात खोचक टीका
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 9:02 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोठा मोर्चा निघाला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली. राऊत यांनी आपल्या भाषणात नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या बापाची आहे. त्यामुळे या महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत होता आणि फडकत राहील, असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

“सकाळपासून सर्वांना चिंता होती की धो-धो पाऊस पडेल आणि मोर्चाचं काय होईल? पण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सूर्यदेवाने प्रकाश दिला आहे. आम्हाला फक्त जनतेचा नाही तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळाला आहे. इथे शिवसैनिकांचा धो-धो पाऊस पडला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“आदित्य ठाकरे इथे येण्यापूर्वी हनुमानाचं दर्शन घेऊन आले. आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वांची गधा दिली आहे. ही गधा अशी फिरवायची आहे की हे चोर बिळात गेल्याशिवाय राहायचे नाही. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! अंबादास दानवे त्यांना चांगला चष्मा आणून द्या आणि गर्दी दाखवा”, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘दिल्लीचे दोन 2 आणि महाराष्ट्राची 40 खोके ‘

“ही मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका ही देखील शिवसेनेच्या बापाची आहे हे लक्षात ठेवा. गेले 30 ते 35 वर्षे शिवसेनेचा भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फडकवला. हा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि महाराष्ट्राची 40 खोके हे जे काही कारस्थानं करत आहेत ती उधळण्यासाठी हा मोर्चा आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“या महाराष्ट्रावर, या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य कायम राहील हे सांगणारा हा मोर्चा आहे. हा मोर्चा या मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरु आहे, शिवसेनेचं राज्य, नगरसेवकांचं राज्य जोरजबदस्तीने काढून, इथे जो भ्रष्टाचार सुरु आहे त्याविरोधात हा मोर्चा आहे”, असं राऊत म्हणाले.

‘निवडणुका घ्या, कोण चोर आहे ते…’

“मुंबईकरांना निवडणुका हव्या आहेत. ते चोर मचाए शोर म्हणत आहेत, आता निवडणुका घ्या, कोण चोर आहे ते जनता दाखवून द्या”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. “ड्रोनच्या माध्यमातून हा विराट मोर्चा पाहा, नाही तुमच्या डोळ्यांची बुबुळे बाहेर आली तर बोला”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘महापालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर’

“एका तरुण नेत्याने मुंबईकरांना साध घातली आणि लाखो मुंबईकर मोर्चात दाखल झाले. या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी आहुती दिली. त्यांचं स्मारक बाजूला आहे. काही उंदिर आपल्याकडे बघत असतील की हा मोर्चा किती मोठा आहे. या महापालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर आहे. तो कुणाला पुसता येणार नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“मुंबईकर आज आशेने आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडे पाहतोय. निवडणुका येऊद्या तुमच्या छाताडावर पाय देवून भगवा झेंडा फडकेल”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.