Raut on Navneet Rana Case: तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणार

Raut on Navneet Rana Case: संजय राऊत यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला.

Raut on Navneet Rana Case: तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणार
तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 11:29 AM

मुंबई: अंडरवर्ल्डचा महोरक्या युसूफ लकडावालाकडून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी 80 लाख रुपये घेतल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राणा दाम्पत्यांनी लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतले आहेत. ही निव्वळ मनी लाँडरिंगची केस (Money Laundering) आहे. राणा दाम्पत्यांनी हा पैसा कशासाठी घेतला होता? त्या पैशाचा वापर कशासाठी करण्यात आला. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबत मी लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्रं लिहिणार आहे. तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? असं लोकसभा अध्यक्षांना विचारणार आहे, असं सांगतानाच देश तोडणारे आणि देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांच्या बाजूने कुणीही राहू नये, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

संजय राऊत यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला. माझा फडणवीसांना सवाल आहे, तुम्ही या प्रश्नावर गप्प का बसला आहात? राणा दाम्पत्यांनी पोलिसांवर आरोप केले होते. आता पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर फडणीस काही बोलले नाही. इतर विषयावर भाजपचे लोक पोपटासारखे बोलतात ना. इतरांच्या बाबतीत आव्हानाची भाषा वापरता, मग याप्रकरणावर का बोलत नाही? या प्रकरणात आव्हानाची भाषा का वापरत नाही? या प्रकरणी ईडीच्या चौकशीची मागणी का करत नाही? असे सवाल राऊत यांनी फडणवीस आणि भाजपला केले.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी का केली नाही?

लकडवालाने मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला गेला. त्यातले एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहेत. त्यांनी लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतले. का घेतले? कशासाठी घेतले? आंतरराष्ट्रीय गुन्हेगार डि गँगशी संबंधित डॉनच्या पैशाचा वापर कुठे झाला? एवढेच पैसे आहेत की अजून आहेत? याचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने का केला नाही? कारण हा लकडावाला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कस्टडीत होता. त्यावेळी आर्थिक गुन्हे विभागाने चौकशी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.

आधीच्या पोलीस आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला ना?

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधीच्या आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला, खासदार झाले. ते चालतं का? ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कायदेशीर कारवाई केली तर त्यांच्यावर शिक्का मारता? राजेश्वरसिंग भाजपमध्ये आले. त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवालही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.