ED नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत, आता पुन्हा ईडी नोटीस पाठवण्याच्या तयारीत

वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना ईडी पुन्हा एकदा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांनी 55 लाख रुपये परत केले आहेत.

ED नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत, आता पुन्हा ईडी नोटीस पाठवण्याच्या तयारीत
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 11:31 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना ईडी पुन्हा एकदा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. ज्या 55 लाख रुपयांच्या व्यवहारप्रकरणात वर्षा राऊत यांना ED ने नोटीस पाठवली होती, ते 55 लाख रुपये वर्षा राऊत यांनी आता परत केले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी 55 लाख रुपये परत केले. त्यामुळेच त्या ईडीच्या रडारवर आहेत. (Sanjay Raut wife Varsha Raut repaid 55 lakh rs after ED summons)

हा पैसा गुन्ह्यातील असल्याने वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं होतं. आता वर्षा राऊत यांनी हे पैसे परत केले आहेत. पैसे परत केले तरी गुन्ह्यातील पैसे घेतले असल्याने त्यांच्याबाबत असलेले आरोप संपत नसल्याचं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 4 जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

वर्षा राऊत यांना ED नोटीस

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना डिसेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवण्यात आली होती.  55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार वर्षा राऊत यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होतं. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकांऊटमधून पैसे ट्रान्सफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

(Sanjay Raut wife Varsha Raut repaid 55 lakh rs after ED summons)

संबंधित बातम्या 

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?    

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांचे 10 मोठे हल्ले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.