मुंबईचा कब्जा घेण्यासाठी सैन्य घुसवणार का? संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना सवाल

सकाळी आज आपल्याकडल्या बाई गेल्याचं मला कळलं. त्या बाईला घाई फार होती. आल्याही घाई-घाईत गेल्याही घाईघाईत.

मुंबईचा कब्जा घेण्यासाठी सैन्य घुसवणार का? संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना सवाल
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:25 PM

मुंबई : वरळी येथे ठाकरे गटाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याला संबोधित केले. संजय राऊत म्हणाले, नाशिक, बंगलोर आणि देवास. (मध्यप्रदेश) येथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत. तिथून ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा बेपत्ता झाल्या. छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले. आता हे ट्रक गेले कुठे. तीन नोटा छापणाऱ्या कारखान्यातून नोटा गायब होतात. राज्यात हा जो खेळ झाला. त्यासाठी हे पैसे वापरले नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजही हा खेळ सुरू आहे. सकाळी आज आपल्याकडल्या बाई गेल्याचं मला कळलं. त्या बाईला घाई फार होती. आल्याही घाई-घाईत गेल्याही घाईघाईत. राज्याव्यापी शिबिर ही खरी शिवसेना आहे. ही शिवसेना राज्याला आपली धगधगती मशाल तेवून नेईल. असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

शिवसेना एकच

शिवसेना एकच. डुप्लिकेट माल खूप. जत्रेमध्ये खूप डुप्लिकेट माल असतो. डुप्लिकेट चंद्र, सूर्य असतो. मर्सिडीज गाडी असते. तिथं लोकं फोटो काढतात. चंद्रावरचा फोटो, सूर्यावरचा फोटो मर्सिडीज गाडीवरचा फोटो काढतात. हे बोगस बियाणे नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांनी टाकलेल्या बियाण्यांचे पीक आहे. हे अब्दुल सत्तार यांचे बोगस बियाणे नाही. हिंदू ह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पेरलेल्या बियाण्यांच्या या ठिणग्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमचा बाप आमच्या पाठीशी उभा

आमचा बाप, या महाराष्ट्राचा बाप, या हिंदुत्वाचा बाप एकच. बाबाचा बाप आमच्या पाठीशी आहे. तोपर्यंत आमची शिवसेना कुणाला चोरता येणार नाही. सध्या दिल्लीतून बरेच मोठे नेते मुंबईत येतात. अमित शाह येतात. जेपी नड्डा येतात. एकच म्हणतात. मुंबई का कब्जा लेंगे. मुंबईचा कब्जा घेणे तुझ्या बापाचे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हिंमत असेल तर मनपा निवडणुका घ्या

हिंमत असेल तर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. नाही अस्मान दाखवलं. नाही छाताडावर पाय रोवून भगवा झेंडा शिवसेनेचा फडकवला तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगणार नाही. मुंबई, पुण्याला, ठाण्याला, नागपूरला महापौर नाही. महापौर हे त्या शहराचं कुंकू असते. तुम्ही आमचे कुंकू पुसले आहे. आमचे भांडण हे या महाराष्ट्र द्रोह्यांशी आहे. महाराष्ट्र, मुंबई विकण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आमचे भांडण आहे. अनेक मोठमोठे उद्योग गेले. क्रिकेटसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर नेले जात आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेटचे सर्वात मोठे मैदान अहमदाबादला गेले. क्रिकेट हा मुंबईला रोजगार देणारा खेळ आहे, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....