पदवीधर निवडणुकीचं राजकारण सत्यजित तांबे निकालादिवशी फोडणार; नाना पटोले यांना टोला…
काँग्रेसचे असलेले सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना फॉर्म मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही.
नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि काँग्रेसमध्ये तांबे पितापुत्रावरून कलगीतुरा रंगाला. एकीकडे एबी फॉर्म दिला असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तर त्याच एबी फॉर्मबाबत पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मात्र शेवटपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
त्याविषयी सविस्तर बोलताना सत्यजित तांबे यांनी म्हटले की, नाना पटोले हे अर्धवट सांगत आहेत, मात्र 2 तारखेला मी सत्य काय ते सांगितल्यानंतर लोकं आश्चर्यचकित होतील असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून नाशिक मतदार संघाची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी लक्षवेधी ठरली होती.
काँग्रेसचे असलेले सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना फॉर्म मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी मात्र काँग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज न भरता त्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले.
आज मतदार झाल्यानंतर मात्र सत्यजित तांबे यांनी विश्वासाने आपण याबाबत आता 2 तारखेला तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. त्यावेळी मात्र तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरू राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर पाठिंब्याबाबत मात्र भाजप चर्चेत आली.
मात्र शेवटपर्यंत सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा न देता अजून त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली आल्या नाहीत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे मात्र सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.