“राऊत जोडीनं शिवसेना डॅमज केली”; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाची पोलखोलच केली…

विनायक राऊत आणि संजय राऊत या जोडीने खरंतर शिवसेना डॅमेज केली आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

राऊत जोडीनं शिवसेना डॅमज केली; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाची पोलखोलच केली...
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 9:18 PM

मुंबईः ठाकरे गट आणि शिंदे गटाची कायदेशीर लढाई सुरू असतानाच दोन्ही गटातील नेत्यांकडून आता आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. त्यातच आज धनुष्यबाण चिन्हाविषयी न्यायालयाचा निर्णयाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले असतानाच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेच्या चिन्हाविषयी बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, मतदारांची संख्या जास्त त्याला पक्षाचा दर्जा मिळतो. आमच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

ठाकरे गटाने बोगस कागदपत्रांवर शिंदे गटावर ठाकरे गटाने निशाणा साधला होता. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी बोगस कागदपत्रे कुणाची पकडली आहेत हे सर्वांना माहिती आहे असं खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाकरे गट वैफल्यग्रस्त झाला आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. त्यांच्याकडून जे झालं नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाने गद्दारीवरून केलेल्या टीकेला उत्तर तेवढ्याच जोरदारपणे त्यांनी दिले आहे. गद्दारी आम्ही केली नाही तर ठाकरे गटाने मतदारांशी गद्दारी केली आहे.

कारण निवडणुकीवेळी मतदारांनी युतीला मतदान केले होते. त्यामुळे आम्ही गद्दारी केली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ठाकरे गटाने गद्दारी केली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाचा वाद न्यायालयात गेल्या नंतर ठाकरे-शिंदे गटाचा वाद टोकाला गेला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला जात असला तरी नेत्यांनी मात्र हे चिन्ह आपलेच असल्याचा दावा केला आहे.

यावेळी दीपक केसरकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांना विनायक राऊत हे गंमतीदार नेते आहेत.

ते माझ्यामुळे निवडून आले आहेत आणि तेही एकदाच निवडून आले आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांना माझी गरज असते मात्र त्यांची मला गरज नाही.

विनायक राऊत आणि संजय राऊत या जोडीने खरंतर शिवसेना डॅमेज केली आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू कोकणातील लोकांची खिल्ली उडवतो त्यापेक्षा दुसरं काही वाईट नाही आणि त्याच कॅटेगरीमध्ये विनायक राऊतही येतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.