तालिबानची मुंबईवर हल्ल्याची धमकी, मेल पाठवणाऱ्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानातला

मुंबईला अशा धमक्या मिळत राहतात. परंतु आम्ही नेहमी सतर्क आहोत. धमकीचा आम्ही तपास करत आहोत. मुंबईला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुंबईकरांनी घाबरू नये.

तालिबानची मुंबईवर हल्ल्याची धमकी, मेल पाठवणाऱ्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानातला
मुंबईवर हल्ल्याची धमकी
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 8:31 AM

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एक ईमेल (email) मिळाला आहे. या ई-मेलमध्ये मुंबईवर दहशतवादी (Terror Threat In Mumbai) हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA ने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्वाजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तसेच ईमेलचा तपासही सुरक्षा संस्थांनी सुरु केला आहे. हा ईमेल करणारा आपण तालिबानी असल्याचा दावा करत मुंबईवर हल्ल्याची धमकी दिली आहे. मेल पाठवणाऱ्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानातला निघाला आहे. तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानी याने दिलेल्या आदेशानंतर मुंबईवर हल्ला करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

मागील महिन्यात धमकी

2 फेब्रवारी रोजी ईमेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांसह एनआयएने संयुक्त तपास सुरू केला आहे. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन वेगवेगळ्या ठिकाणी बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील 199 ठिकाणी बाँबस्फोट करणार असल्याचे म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोंबर2022 मध्ये मुंबईतील वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर धमकी आली होती. धमकी देणारा फोन क्रमांक पाकिस्तानातील होता. माझा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला तर भारताबाहेर दाखवेल, असे त्याने म्हटले होते. मुंबईला उडवण्याची तयारी सुरू आहे 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याकरिता काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

कोण आहे सिराजुद्दीन हक्कानी

सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या पुनरागमनानंतर त्याला कार्यवाहक गृहमंत्री बनवण्यात आले आहे. यासोबतच तो तालिबानमधील नंबर २ नेता आहे. तालिबानमध्ये हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने हक्कानीच्या ठिकाणाची माहिती देणाऱ्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.

मुंबई पोलिस म्हणाले, है तैयार हम

मुंबईला अशा धमक्या मिळत राहतात. परंतु आम्ही नेहमी सतर्क आहोत. धमकीचा आम्ही तपास करत आहोत. मुंबईला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुंबईकरांनी घाबरू नये. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत, असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केला आहे.

अन्य तपास यंत्रणाही सतर्क

तपासासाठी एटीएस बरोबरच अन्य तपास यंत्रणाही संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईच्या सागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मुंबईचे सागरी कवच अधिक सक्षम करण्यासाठी तटरक्षक दलाच्या समन्वयाने काम सुरू असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.