नवी मुंबईत जैविक कचऱ्याकडे दुर्लक्ष, डॉक्टरांच्या चेंजिंग रुमशेजारीच 5 दिवस कचरा पडून
नवी मुंबईत 4 खासगी कोविड रुग्णालयांकडून आपला जैविक कचरा चक्क कचरा कुंडीत टाकला जातोय (Negligence about Bio waste in Navi Mumbai).
नवी मुंबई : एकिकडे कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा जोरदारपणे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईत दोन धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील 4 खासगी कोविड रुग्णालयांकडून आपला जैविक कचरा चक्क कचरा कुंडीत टाकला जातोय (Negligence about Bio waste in Navi Mumbai). या चार रुग्णालयांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार झालाय. मात्र, कारवाईला होणाऱ्या उशिरामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आणि रुग्णालयाचे साटलोट तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून जोरदार प्रयत्न होत असताना खासगी रुग्णालयांच्या या बेजबाबदार वर्तणुकीवर नागरिक चांगलीच नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच संबंधित रुग्णालयावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
याहूनही दुसरी धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील जैविक कचरा उचललाच जात नाही. पाच पाच दिवस हा जैविक कचरा उचलला जात नाही. कारण हा जैविक कचरा उचलणाऱ्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला मागील पाच महिन्यांपासून वर्क ऑर्डर न दिल्याने जैविक कचरा रुग्णालयात साचला जातोय. तो ही डॉक्टर आणि नर्स यांच्या चेंजिंग रुम शेजारी.
जैविक कचरा उचलणाऱ्या या कंपनींचे 40 लाखाहून अधिक पैसे येणं असताना देखील महापालिकेने एक दमडीही या कंपनीला दिली नाही. असं असलं तरी संबंधित कंपनीने पाच महिने कोरोनाचं संकट पाहता शक्य तितका कचरा उचलल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे या प्रशासकीय गोंधळाला कारणीभूत असलेल्यांना आणि दोषी खासगी रुग्णालयांना पाठिशी घातलं जात असल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे.
हेही वाचा :
कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या
नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन
Negligence about Bio waste in Navi Mumbai