‘Ajit Pawar शिखर बँकेतील 25 हजार कोटींचे दरोडेखोर’; शालिनीताई पाटील यांचा घणाघाती आरोप!
Shalini Tai Patil on AJit pawar : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी ताई पाटील यांनी अमित शहांचे आभार मानत शिखर बँकेतील दरोडेखोरावर कारवाई करण्याची मागणी केलीये.
मुंबई : लोकसभेमध्ये अविश्वास ठरावावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्लाईंग किस दिल्याचा आरोप केला जात आहे. याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका करताना, 9 वर्षांमध्ये 9 सरकारं पाडली असल्याचा टीका केली होती. यावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, वसंतदादांचं सरकार पाडल्याचा दाखला देत सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं. याचाच धागा पकडत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी ताई पाटील यांनी अमित शहांचे आभार मानत शिखर बँकेतील दरोडेखोरावर कारवाई करण्याची मागणी केलीये.
काय म्हणाल्या शालिनीताई पाटील?
अमित शहा यांना माझी विनंती आहे की, तुम्ही माझ्या संस्थेची सुमारे 25 हजार सभासदांची मालमत्ता दिवसा ढवळ्या दरोडे घालून ज्या व्यक्तीने लुटून नेली. तो शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा दरोडेखोर ज्याला सुप्रीम कोर्टाने आरोपी ठरवलं आणि त्याच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आम्ही FIR दाखल केला, याला आता 4 वर्षे पूर्ण झाली. मात्र त्याचावर आता कोणतीही कारवाई न करता त्या आरोपीला पक्षात घेता इतकंच नाहीतर त्याला राज्याचा उपमुख्यमंत्री करता हा महाराष्ट्राच्या खुर्चीसह अपमान असून जनतेचीही निराशा केल्यासारखं आहे, असं शालिनी ताई पाटील म्हणाल्या.
शालिनी ताई पाटील यांनी नावन घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंं नाव न घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबतच, तुम्ही आरोपीला पक्षात येण्यासाठी निमंत्रण देत त्याला उपमुख्यमंत्री करत तुम्ही आमच्या दु:खावर फुंकर घालत आहात की मीठ चोळत आहात? हे काही कळत नाही. यावर खुलासा करावा. मला तुम्हाला दिल्लीत येऊन भेटता येणार नाही त्यामुळे तुम्ही मला यावर उत्तर द्यावं, असं शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजप-शिंदेस गटामध्ये गेले होते तेव्हा शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडल्याची आठवण सर्वांना झाली. त्यावेळी, शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. धूर्त आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असं शालिनी पाटील म्हणालेल्या.