मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा, शालीनी ठाकरे म्हणतात, इतक्या खालच्या दर्जाचं…
शिवसेनेचा समाचार आधीपण राज ठाकरे यांनी घेतला. पुढंही ते समाचार घेणार आहेत.
मुंबई – मनसेनं गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. हा महत्वपूर्ण मेळावा असल्याचं शालीनी ठाकरे यांनी सांगितलं. गट अध्यक्षांना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवावं लागते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा आहे. ठामपणे कोणी काही सांगू शकत नाहीत. त्यामुळं पुढं काय होईल, ते आम्ही बघतो. मनसेनं टीझर लाँच केलं. आता फक्त मनसे हा पर्याय राहिलेला आहे, असं त्यातून वाटतं. त्यावर शालीनी ठाकरे म्हणाल्या, महाराष्ट्रानं कधीही इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण पाहिलेलं नाही.
आज ज्या प्रकारे गटबंधन झालेलं आहे. ते गटबंधन मतदानानुसार झालेलं नाही. मतदारांनी त्यांचा कल वेगळा दिला होता. त्यानंतर जे झालं त्यावर पुढं परिणाम काय होईल. महाराष्ट्रान असं राजकारण बघीतलेलं नाही. राज ठाकरे यांचं मत सारखंच आहे. लोकांना त्यांचं मत पटतं. लोकांना त्यांचं मत आवडतं.
शिवसेनेचा समाचार आधीपण राज ठाकरे यांनी घेतला. पुढंही ते समाचार घेणार आहेत. लोकांनाही हे अपेक्षित आहे, असं शालीनी ठाकरे यांनी सांगितलं. महिलांचे अनेक प्रश्न आहेत. महिला खूप महत्वपूर्ण गट आहे. ५० टक्के महिला उमेदवार होणार. दोघांचेही मतं जवळपास सारखंच आहे. महिलांचे रोजगाराचे प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न राज ठाकरे नेहमीचं चांगले विचार मांडतात.
या मेळाव्यातून गट अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. राज ठाकरे यांचे विचार लोकांना आवडतं. अशा मेळाव्यातून खूप फरक पडतो. राज ठाकरे यांच्या भाषणाची नेहमीचं उत्सुकता असते.