पवारसाहेब हे जनसामान्यांमध्ये असणारे,रमणारे नेते; ‘अशाप्रकार’ची जबाबदारी त्यांना कितपत पटेल माहित नाही; दिलीप वळसे-पाटील

मुंबई: पवारसाहेब (Sharad Pawar) हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना अशाप्रकारची जबाबदारी देऊन त्यांना कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walase-Patil) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) जनता दरबारला राष्ट्रवादी […]

पवारसाहेब हे जनसामान्यांमध्ये असणारे,रमणारे नेते; 'अशाप्रकार'ची जबाबदारी त्यांना कितपत पटेल माहित नाही; दिलीप वळसे-पाटील
राष्ट्रपती पदाच्या निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील दिलीप वळसे पाटील Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 5:18 PM

मुंबई: पवारसाहेब (Sharad Pawar) हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना अशाप्रकारची जबाबदारी देऊन त्यांना कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walase-Patil) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) जनता दरबारला राष्ट्रवादी भवनमध्ये आले असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांविषयी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते.

यावेळी पवारसाहेब राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले.

 देशातील काही वेबसाईट हॅक

मागील दोन दिवसात देशातील काही वेबसाईट हॅक झाल्या आहेत हे सत्य आहे असे सांगतानाच यासंदर्भात सायबर सेलचे प्रमुख मधुकर पांडे हे माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्याची वेबसाईटही हॅक झाली आहे, परंतु महत्त्वाचा डाटा गेलेला नाही. समाजा-समाजात जी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हे कारण आहे त्याचाच हा परिणाम आहे. हॅकर्सने जगातील सर्व हॅकर्सना तुम्ही यामध्ये सहभागी व्हा असे आवाहन केले आहे.

राज्यसरकारकडून आढावा

वेबसाईट हॅक करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. याबाबत राज्यसरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात यंत्रणा माहिती घेत आहेत असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले. आपल्या देशात समाजासमाजामध्ये विद्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे त्याला प्रतिकार म्हणून, प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती काही समाजातील टोकाचा विचार करणार्‍या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही.

सलोख्याचे समाजातील संबंध हवेत

शेवटी सगळ्यांना सलोख्याने रहायचं असेल तर एकमेकांच्या अडचणी व भावना समजून घेणे गरजेचे आहे. जे अपील केले जात आहे त्यामध्ये नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर रहावे असे आवाहनही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी केले.

देशाच्या प्रमुखाने माफी मागावी

मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य करण्यात आले त्यासंदर्भात देशाच्या प्रमुखाने माफी मागावी ही मागणी आहे. मात्र पक्षाच्या प्रवक्त्याने जे उद्गार काढले त्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कारवाई सुरू आहे. आता याबाबत काय निर्णय घ्यायचा हे देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः ठरवावे असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

जागतिक नीतीचा हा भाग

मुस्लिम बहुल देशाकडून भारत तेल आयात करतो त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता जागतिक व्यापाराचा आणि जागतिक नीतीचा हा भाग आहे. आंतरराष्ट्रीय नीती ठरवण्याचे काम केंद्रसरकार करत असते. त्यामुळे केंद्र सरकार याची जरुर दखल घेईल असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी मांडले.

सर्व पोलीस सतर्क

नमाज पठणानंतर कुठलीही घटना होऊ नये यासाठी राज्यातील सर्व पोलिसांना सतर्क करण्यात आलेले आहे आणि सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याची काळजी पोलीस घेतील असे सांगतानाच ज्यापद्धतीने वक्तव्य आले आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी आज हा मेसेज दिला गेला आहे. अशाप्रकारची वक्तव्य होऊ नये. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मर्यादा बाळगल्या पाहिजेत त्याचाच हा संदेश आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.