Sharad Pawar : राष्ट्रवादी अजित पवार यांनी फोडली अन् शरद पवार ‘या’ नेत्याला बोलले, पाहून घेईल
राष्ट्रवादी पक्षात अशी फुट पडेल कोणीही कल्पना केली नसावी, पण अजित पवारांना हाताशी धरत देवेंद्र फडणवीसांनी डाव साधला. शरद पवार यांनीही राष्ट्रवादी फुटली यालर शिक्कामोर्तब केलं आणि नव्याने वाटचाल करू म्हणत त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. मात्र पवारांनी अजित पवारांच्या गटातील एका नेत्याला इशारा दिला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुधवारी मुंबईत दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या. अजित पवार यांनी बंड पुकारल्यांनतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आज झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या सोबत 32 आमदार तर शरद पवार यांच्या सोबत 16 आमदार होते. यावरून आमदारांचा कल कोणाकडं आहे, हे स्पष्ट होतं. येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. लोक म्हणतात आम्ही साहेबांचा फोटो का लावला, कारण साहेब आमचे विठ्ठल आहेत. त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आर्शिवाद द्या, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
या आरोपावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर खरपूस टीका केली. विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत ते आम्हाला साहेबांना भेटून देत नाही, असा आरोप करण्यात आला. दोन वर्षाचा तुरुंगवास भोगून ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा पवार साहेबांनी त्यांच्या डोक्यावर फुले पगडी ठेवून त्यांचा सम्मान केला, तेव्हा बडवे आडवे आले का? जर बडवे आडवे येत होते तर महाविकास आघाडीत तुम्हाला मंत्रीपद कसे मिळाले. जेव्हा शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राष्ट्रवादीतून मंत्री पदासाठी पहिले नाव तुमचे पाठवले होते. तेव्हा बडवे आडवे आले का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
छगन भुजबळांना पाहून घेऊ, शरद पवार स्पष्टच बोलले!
छगन भुजबळ तुरुगांत गेले होते. तुरुगांतून बाहेर आल्यावर त्यांना तिकिट देवू नका, असे मला सहकाऱ्यांनी सांगितले पण मी त्यांना तिकिट दिलं. संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत उभा राहिला. छगन भुजबळ निवडून आले, त्यांना मंत्री करण्यात आलं. मला आठवतंय 3 दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता. नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी मी तिकडं जातो, पाहतो, बघतो आणि तुम्हाला सांगतो असं सांगून ते गेले आणि पाहतो तर काय त्यांनी शपथच घेतली. ही माझी माणसं आहेत, पाहून घेईल अशा शब्दात शरद पवारांनी छगन भुजबळांना एक प्रकारे इशाराच दिला.