Eknath Shinde: सर्वसामान्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हिताचे निर्णय; रिक्षावाला, टपरीवाला, वॅाचमन आणि भाजीवाल्यांसाठी कल्याणकारी योजना

महाराष्ट्रात अंदाजे 8 लाख 32 हजार रिक्षा तर 90 हजार टॅक्सी परवानाधारक आहेत. मात्र रिक्षावाला, पानटपरीवाला आणि कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविर.

Eknath Shinde:  सर्वसामान्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हिताचे निर्णय; रिक्षावाला, टपरीवाला, वॅाचमन आणि भाजीवाल्यांसाठी कल्याणकारी योजना
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 11:39 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhansabha Result 2022) एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडखोरी करत शिवसेनेचे निम्यापेक्षा जास्त आमदार बंडखोर शिंदे घटात सामील झाले. त्यानंतर शिंदे गटावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांनी पानटपरीवाला ते रिक्षावाला अशी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर निशाना साधला होता. मात्र आता याच कष्टकरी घटकांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उपनेते उदय सामंत यांनी दिली आहे.

 शिंदे गटावर टीकेची झोड

एकनाथ शिंदे गटाने मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि तिथून थेट मुंबई असा प्रवास करत राज्यातील राजकारण ढवळून काढले. शिंदे गटामुळे ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागल्यानंतर शिंदे गटावर टीकेची झोड उठवण्यात आली. शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे स्पष्ट झाले तेव्हा शिंदे यांच्या गटातील गुलाबराव पाटील,संदिपान भुमरे या मंत्र्यासह काही आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका करण्यात आली. शिंदे यांना रिक्षावाला,गुलाबराव पाटील यांना टपरीवाला, संदिपान भुमरे यांना वॅाचमन तर प्रकाश सुर्वे यांची भाजीवाला अशी अवहेलना केली गेली.

सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा

गुवाहटी नाट्य संपुष्टात येताच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर नवे सरकार येताच शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आता ज्यांची रिक्षावाला, टपरीवाला, वॅाचमन आणि भाजीवाला अशी अवहेलना केली गेली होती, अशा कष्टकऱ्यांसाठी आता शिंदे-फडणवीस सरकार मोठा आणि महत्वाचा निर्णय घेणार आहे.

 तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर योजना

महाराष्ट्रात अंदाजे 8 लाख 32 हजार रिक्षा तर 90 हजार टॅक्सी परवानाधारक आहेत. मात्र रिक्षावाला, पानटपरीवाला आणि कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी मंडळ स्थापन करण्याची मागणी रत्नागिरीचे आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असून कष्टकरी जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती आमदार सामंत यांनी दिली आहे.

भाजी व्यावसायिकांना टोलमुक्ती

राज्यातील भाजी व्यावसायिकांना टोलमुक्ती देवून या वर्गाला मोठा दिलासा देण्याचा निर्णय शिंदे सरकार घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे तर सुरक्षारक्षक यांच्या वेतनाच मोठी वेतनवाढ करण्याबरोबरच त्यांना निवृत्तीवेतन देण्याचा मानस शिंदे सरकारचा आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासोबतच टपरीधारकांना शासकिय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शिंदे घेणार असल्याची माहिती आमदार सामंत यांनी दिली आहे.

तात्काळ अंमलबजावणी केली तर

शिंदे-फडणवीस सरकारने या योजनांची तात्काळ अंमलबजावणी केली तर मात्र कित्यक कष्टकरी जनतेला याचा फायदा होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.