मुंबईत नाईट लाईफ, राज्यात शिवथाळी, प्रजासत्ताक दिनी 2 महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ

राज्यभरात उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात (shiv bhojan thali and night life start today) आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

मुंबईत नाईट लाईफ, राज्यात शिवथाळी, प्रजासत्ताक दिनी 2 महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ
Follow us
| Updated on: Jan 26, 2020 | 8:44 AM

मुंबई : राज्यभरात उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात (shiv bhojan thali and night life start today) आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाकरे सरकारकडून मुंबईत ‘नाईट लाईफ’ आणि राज्यात ‘शिवथाळी’ या दोन्ही योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे.

‘नाईट लाईफ’चा शुभारंभ

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वपूर्ण ‘नाईट लाईफ’ संकल्पनेला आजपासून सुरुवात होत आहे. आज मध्यरात्रीपासून (27 जानेवारी) मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर काही निश्चित केलेल्या ठिकाणी रात्रभर हॉटेल्स, मॉल, थिएटर सुरु ठेवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा यांसह विविध ठिकाणच्या हॉटेल, पब, मॉल्स, थिएटरचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ही संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. हा प्रयोग सध्या मुंबईपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे भविष्यात पुणे, नाशिक यासारख्या विविध शहरात नाईट लाईफ सुरु करण्याबाबत विचार केला जाणार (shiv bhojan thali and night life start today) आहे.

10 रुपयांत पोटभर जेवण

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आजपासून होणार आहे. अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे याची संपूर्ण जबाबदारी दिली आहे.

शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येईल.

राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु असेल. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय (shiv bhojan thali and night life start today) चालकाची असेल.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.