प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून फुले वाहिलीय. ते औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले. त्यांच्या या कृतीवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 11:44 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगजेबाच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी ते औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली. त्यांच्या या कृतीवर शिवेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मला हे अपेक्षित नव्हतं. प्रकाश आंबेडकर सारखा विद्वान नेता, अशी घटना त्यांच्या हातून होईल, असं मला अपेक्षित नव्हतं. आम्ही त्यांना वेगळ्या अँगलने पाहतो. मात्र या घटनेने थोडा राग, थोडा द्वेष आलाय”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाठ यांनी दिली. “औरंगजेबाने जे अन्याय अत्याचार केलेत, ते एका जाती-धर्मावरती नाहीत. पहिल्यांदा टार्गेट झालाय तो दलित समाज”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“प्रकाश आंबेडकर यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यांनी कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा केले नाही. मात्र औरंगजेबाच्या कबरीला जाऊन फुले वाहनं या पाठीमागे त्यांची काय भूमिका असेल? मला माहित नाही. मात्र ही घटना निंदनीय आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘औरंगजेबाने आपलं भलं केलं आहे का?’

“औरंगजेबाने आपलं भलं केलं आहे का? मंदिर उद्ध्वस्त केले, महिलांवर अत्याचार केले. त्याबद्दल आपुलकी असायचं काही कारण नाही. यांचा इतिहास बघा. बापाला छळ करून मारले. त्याच्याबद्दल कशी आपुलकी आली?”, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. “मुस्लिम समाजामध्ये औरंगजेब नाव सुद्धा ठेवले जात नाही. इतका कडवट विरोध मुस्लिम समाज करतो. त्याचं चांगुलपण करायची आपल्याला गरज काय आहे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

‘असं स्वप्नातही पाहू नका’

“वेगळं काहीतरी ट्विस्ट करायचं असतं. मात्र मुळामध्ये याचा फायदा होत नाही तर लोकांमध्ये संताप व्यक्त होतो. तिथे जाऊन तुम्हाला काय मिळालं? औरंगजेबाच्या कबरीला फुले वाहून इतर लोक आहेत ते मतदान करतील असं स्वप्नातही पाहू नका”, असं संजय शिरसाट यांनी सुनावलं.

‘उद्या संजय राऊत सुद्धा औरंगजेबाच्या कबरवरती जाऊ शकतात’

“कदाचित उद्या संजय राऊत सुद्धा औरंगजेबाच्या कबरवरती जाऊ शकतात, फुले वाहू शकतात. ती त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकते. त्यामुळे उद्याचे चित्र काय असू शकतं, हे सर्वसामान्य माणसाला कळून चुकलं आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

“मताच्या लाचारीसाठी आपण काय-काय करतोय कोणती पावलं उचलतोय? मी पहिल्यापासूनच बोललो होतो की त्यांची युती टिकणार नाही. टिकवायचं असेलच तर हे सर्व तुम्हाला स्वीकारावं लागेल”, असं शिरसाट म्हणाले.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.