‘लोक म्हणतात शेठ झालं का तुमचं मंत्रिपदाचं थेट? अभिनंदन, पण सूत्र आम्हाला बुचकळ्यात पाडतात’

शिवसेना आमदार भरत गोगावले टीव्हीच्या सूत्रांना अक्षरश: वैतागले आहेत. त्यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. तसेच टीव्हीवरील बातम्या ऐकून आपल्याला हितचिंतकांचा शुभेच्छांचा फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

'लोक म्हणतात शेठ झालं का तुमचं मंत्रिपदाचं थेट? अभिनंदन, पण सूत्र आम्हाला बुचकळ्यात पाडतात'
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:40 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजही झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाबबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. टीव्हीच्या अनेक सूत्रांकडून याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. पण टीव्हीच्या या सूत्रांनाच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले वैतागले आहेत. भरत गोगावले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आज प्रतिक्रिया देताना आपली उद्विग्नता व्यक्त केली. यावेळी त्यांनी टीव्ही सूत्रांमुळे लोकं बुचकळ्यात पडत असल्याचं मत मांडलं. यावेळी त्यांनी आपण 101 टक्के मंत्री होऊ, असं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरही दावा केला आहे.

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

“मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन कालही आलेला नव्हता आणि आजही आलेला नाही. जोपर्यंत आम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बातम्या गृहीत धरत नाहीत. कारण गेले अनेक दिवस तुमचं तेच आहे. तुमचे सूत्र चालवतात आणि सर्व जनतेला बुचकळ्यात पाडतात. आम्हाला आज हजारो फोन आले, शेठ झालं का तुमचं? अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. ते म्हणत आहेत, आम्ही निघालो आहोत. गाड्या केल्या आहेत. म्हटलं,थांबा. याचा अर्थ आहे की, जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचं निश्चित होईल तेव्हा वरिष्ठांकडून निरोप येईल. तुम्हाला अमूक वाजता यायचं आहे, असा निरोप येईल”, अशा शब्दांत भरत गोगावले यांनी उद्विग्नता व्यक्त केली .

“सध्या खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. त्यावरुनच थोडसं झालेलं होतं. पण आम्हाला असं वाटतंय की, आजच्या दिवसात हे सर्व संपून जाईल. कारण त्यांनी काल मागितलेली खाती कदाचित आमच्याकडे आणि भाजपकडे असतील, त्यातील काही खाती त्यांना अपेक्षित आहेत ती आम्हाला आणि भाजपलाही अपेक्षित आहेत. त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. त्यातून कोणीतरी मागे-पुढे सरकणं गरजेचं आहे. मग कुणीही असेना. आम्ही असो, भाजप असो, किंवा ते असो. तिघं एकत्र आलो आहोत तर तिघांनी समजून घेतलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? गोगावले म्हणाले…

“आमच्या वाटेला जे काही खाती येतील त्यामध्ये आम्ही जे वेटिंगवर आहोत त्याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. मंत्रिपदाची माझी निश्चिती कालपर्यंत शंभर टक्के होती. आता 101 टक्के झालेली आहे. कारण आमचा नंबरच पहिल्या यादीत लागला होता. पहिल्या नऊ मंत्र्यांमध्ये माझा नंबर होता. पण काही कारणास्तव मी थांबलो होतो. तो आतापर्यंत थांबलो. आता पुढे थांबण्याची आवश्यकता वाटत नाही. अजित पवार आणि त्यांची कंपनी येणार होती म्हणूनच लेट झालेलं आहे. आता एखाद-दोन दिवसांत हे होणं अपेक्षित आहे”, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.

‘महिला आणि पुरुष थोडासा फरक येतो ना?’

“मंत्री अदिती तटकरे यांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही काही वाईट आहोत? आम्ही त्यापेक्षा चांगलं काम करु. कारण महिला आणि पुरुष थोडासा फरक येतो ना? गेले 15 वर्ष आमदारकीचा आम्हाला अनुभव आहे. रायगडच्या आमच्या सर्व 6 आमदारांची भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत, अशी भूमिका आहे”, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.