AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री काय होणार?’, भरत गोगावले यांच्याकडून नाराजी व्यक्त?

शिवसेना नेते भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. राज्य सरकारकडून आज 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

'मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री काय होणार?', भरत गोगावले यांच्याकडून नाराजी व्यक्त?
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 6:20 PM

रवी खरात, Tv9 मराठी, रायगड| 4 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु होत्या. त्यानंतर आज मोठी बातमी समोर आली. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन अजित पवार आणि भाजपमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. अखेर अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. राज्य सरकारकडून आज 11 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदावरु डच्चू देण्यात आलाय. त्यांच्याऐवजी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. चंद्रकांत दादांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने भरत गोगावले यांच्या गळ्यात अद्याप मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. भरत गोगावले यांनी अनेकवेळा मंत्रिपदाची आशा व्यक्त केलीय. पण त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही. या दरम्यान 11 जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर करण्यात आलीय. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

भरत गोगावले यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

“आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात जे काही ठरलं, त्यानंतर याबाबतची आज घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं. चांगली बाब आहे. त्याचं अभिनंदन! खरंतर पालकमंत्रीपद त्यांना दिलं नव्हतं. कदाचित ते बसून ठरवून त्यांना दिलं असेल”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिलं.

रायगड आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे तो निर्णय आहे. मागच्या वेळेला चर्चा झाल्याप्रमाणे कदाचित तो निर्णय झाला नसावा. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील”, असं भरत गोगावले म्हणाले.

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत गोगावले नेमकं काय म्हणाले?

“रायगडचं पालकमंत्रीपद सध्या मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. अडचणीची बाब नाही. उदय सामंतांकडे पहिल्यापासूनच ते पालकमंत्री पद दिलं आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे राहील, असं मला वाटतं”, अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.

पालकमंत्री पदासाठी आपली वर्णी लागू शकते का? असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रयत्न चालू आहेत. “योग्य वेळेला ते होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निर्णय घेण्याचा अधिकार सोपवला आहे. ते योग्य निर्णय घेतील, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

यावेळी भरत गोगावले यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मी मंत्री झालो नाही. त्यामुळे पालकमंत्री कसा होणार? मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री होता येईल. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रीपद राखून ठेवलेलं आहे. विचार विनिमय चालू आहेत. त्यातून योग्य ते घडेल”, असं भरत गोगावले म्हणाले.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.