शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात पोहचला, काय केली मागणी?

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात पोहचला, काय केली मागणी?
shrirang barne
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 12:06 PM

लोकसभा निवडणुकीचा निकालात राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीमधील अनेक जणांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीला ३० जागांवर विजय मिळाला. महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला होता. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात जागांवर विजय मिळवला. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघातील जागा आहे. मावळमधून शिंदे सेनेचे उमेदवार श्रीरंग चंदू बारणे यांचा विजय झाला. त्यांच्या या निकालास आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्या निकालाविरोधात पराभूत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील मुंबई उच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यांनी याचिका दाखल केली आहे.

काय आहेत अ‍ॅड राजू पाटील यांचे दावे

खासदार श्रीरंग बारणे यांच्या निकालास आक्षेप घेणारी याचिका अ‍ॅड. राजू पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेत त्यांनी निकालात आणि प्रचारादरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार केली आहे. राजू पाटील यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदानात ५७३ मतांची तफावत आहे. इतकी तफावत येऊ नये. तसेच मतमोजणीच्या दिवशी अनेक अनोळखी लोक मतदान केंद्रात फिरत होते. त्यासंदर्भात आपण रितसर तक्रार दिली होती. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही.

प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप

राजू पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात पुरावे आपण न्यायालयातील याचिकेत दिले असल्याचे म्हटले आहे. खासदार बारणे धार्मिक ध्रुवीकरण करुन जिंकून आले आहे. त्यासंदर्भात आपण आक्षेप घेतला आहे. त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. १९८८ मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरण याचिकेत दिले आहेत. या याचिकेत अनेक गंभीर मुद्दे न्यायालयासमोर आणले आहे. त्यामुळे आपणास न्याय मिळेल, असा दावा राजू पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.