AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सामना’ अग्रलेखावरुन भाजप-ठाकरे गट आमनेसामने, आंदोलनकर्त्यांची धरपकड

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हे आंदोलन केलं जात आहे. राऊत यांनी 'सामाना'च्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरुन हा वाद उफाळला आहे.

'सामना' अग्रलेखावरुन भाजप-ठाकरे गट आमनेसामने, आंदोलनकर्त्यांची धरपकड
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 5:13 PM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : मुंबईत आज पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते अद्याप तरी समोरासमोर आलेले नाहीत. पण दोन्ही पक्षाचे नेते रस्त्यावर आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती कार्यकर्त्यांना मिळाली आहे. याच माहितीच्या  पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामना कार्यालयाच्या बाहेर आले आहेत.

दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयाबाहेर शेकडो भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहेत. तसेच सामना वृत्तपत्राची कार्यकर्त्यांकळून जाळपोळ करण्यात आलीय.

ठाकरे गटाच्या गोटात हालचाली काय?

भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट देखील सतर्क झालाय. ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक सामना कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील तिथे उपस्थित आहेत. कोणतीही वाईट घटना घडू नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. पण भाजप कार्यकर्ते खरंच आंदोलनासाठी सामना कार्यालयाबाहेर चालून आले तर त्यांना तोडीस तोड उत्तर देणार असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यादेखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

भाजपच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक

मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे भाजपचं मुख्यालय आहे. या मुख्यालयाबाहेर शेकडो भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले. इथे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. “संजय राऊत यांनी अग्रलेखात अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. तुम्ही आम्हाला मजबूर कराल तर जशास तसं उत्तर देऊ”, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी या आंदोलनात दिला.

भाजप कार्यकर्ते निषेध आंदोलन करत आहेत. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत.

संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....