आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा इशारा, एकनाथ शिंदे यांना खरंच अटक होणार?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या आडून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मोर्चात केला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारला मोठा इशारा दिला.

आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा इशारा, एकनाथ शिंदे यांना खरंच अटक होणार?
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 6:24 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. विशेष म्हणजे या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. ज्यादिवशी ठाकरे गटाचं सरकार येईल त्यादिवशी सर्व भ्रष्टाचारांचा हिशोब होईल. आमचं सरकार ज्यादिवशी येईल त्यादिवशी सर्वांना अटक करु, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर चार मोठ्या घोटाळ्यांचा आरोप केला.

“तुम्ही मला पप्पू म्हणतात ना, मी पप्पू चॅलेंज देणार. या अंगावर. छातीवर वार करायला या. मी त्यांना हेच सांगितलं की, मी चॅलेंज देतोय, ५० रस्तेही तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. आम्ही गेले 10 वर्ष फिरतोय. महापौरांना घेऊन शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर गेलोय. अधिकाऱ्यांना रस्त्यांचं काल लवकर का होत नाही म्हणून जाब विचारला आहे. रस्त्यांची कामे कशी आणि कधी होतात ते मला माहिती आहे. मी जे बोललो ते खरं ठरलं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात हे ५० रस्त्यांचं कमीत कमी टार्गेट घेतलं. पण एकही रस्ता ही महापालिका पूर्ण करु शकलेली नाही. महापालिकेत काय चाललं आहे? तुम्ही मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारसाठी काम करत आहात?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

हे सुद्धा वाचा

‘मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’

“मी आजही सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचं सरकार येईल, ते येणार म्हणजे येणार आहे, त्या दिवशी पहिलं काम हेच असणार मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्यांचा घोटाळा भयानक आहे”, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

“पहिला घोटाळा हा रस्त्यांचा घोटाळा आहे. मी इथे यायला निघालो तेव्हा मला विचारलं होतं की, तुम्ही निवेदन देणार का? मी म्हटलं, चोरांना काय निवेदन देणार? मी फाईल बनवली आहे. ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्यादिवशी आम्ही आणि पोलीस आत येणार आणि तुम्हाला अटक करणार”, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

‘भूतांना दूर करायचं आहे’

“येताना हनुमानजींचं दर्शन घेऊन आलो. मनात एकच ओढ होती की, भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे, तेच करायचं आहेत. आपल्या आजूबाजूला जी भूतं आहेत त्यांना दूर करायचं आहे”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.