आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र, नेमकं काय म्हटलंय?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आयुक्त काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 10:02 PM

ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोस्टल रोडच्या कामकाजाबद्दल महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे. “मी तुम्हाला विनंती करतो की, कोस्टल रोडच्या वाहतूक वगळता इतर ठिकाणांचे हरित संवर्धन करत उत्तम प्रकारे लँडस्केप कसे करता येईल हे ठरवण्यासाठी आम्ही पूर्वी नियोजित केल्यानुसार, जागतिक स्तरावरील स्पर्धा आयोजित करा”, असं आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

“या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांची आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थाची मदत घ्या. याशिवाय, मी तुम्हाला विनंती करेन की, दक्षिण मुंबईचे खासदार आणि वरळी आणि ताडदेवचे आमदार यांच्यासह स्थानिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवाशी संस्था/समुदाय ह्यांच्याकडून ह्या जागांचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल ह्याबद्दल सूचना मागवाव्यात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

‘माझ्या विनंतीचा तुम्ही नक्की विचार कराल अशी आशा’

“हा प्रकल्प मूळतः कोस्टल रोडसाठी नियोजित असलेल्या आणि राखून ‘ठेवलेल्या निधीतूनच झाला पाहिजे, असे मी आग्रहाने सांगेन. हा एक शहरातील प्रकल्प आहे, जो संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेने राबवलेला आहे. मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवरील खाजगी तबेल्यांवर ₹१०० कोटी खर्च करणे टाळू शकते आणि तो निधी इथेही वापरू शकते. माझ्या विनंतीचा तुम्ही नक्की विचार कराल अशी आशा करतो. आणि या जागांचे नियोजन कशा प्रकारे व्हावे ह्याबद्दल कंत्राटदारांचे नव्हे तर मुंबईकरांचे म्हणणे ऐकले जाईल अशी अपेक्षा करतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ह्यांच्या संकल्पनेनुसार साकार होत असलेला ‘कोस्टल रोड’ हा केवळ शहराच्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचाच नव्हे तर शहराच्या लँडस्केपचाही कायापालट करणारा होता. ‘कोस्टल रोड’ म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोठ्या मोकळ्या हिरव्यागार जागा असा मुंबईकरांसाठीचा समृद्ध प्रकल्प होता. शिवाय, पर्यावरण पूरक उपायांमधून हवामान बदलाला रोखणारा आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प ठरत होता”, अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.