BREAKING | ‘शरद पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत राजीनामा दिला’, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

"शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तो कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याचं विश्लेषण तेच करु शकतात. पण त्यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुखांचा राजीनामा मागे घ्यावा लागला", असं संजय राऊत म्हणाले.

BREAKING | 'शरद पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत राजीनामा दिला', संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 4:51 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. खरंतर संजय राऊत यांनी ट्विट करुन आधीच आपली भूमिका मांडलीय. पण त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. शरद पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत हा निर्णय घेतलेला आहे. पण शरद पवार यांनी फक्त पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकीय सन्यास घेतलेला नाही. ते शरद पवार आहेत. एक स्तंभ आणि शिखर आहेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. तसेच शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

“शरद पवार सारखे नेते राजकारण आणि समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर शिवसेनेने भाष्य करणं योग्य नाही. पण ते शरद पवार असल्याने इतकंच सांगेल की, ते शरद पवार असल्याने त्यांच्या नेतृत्वाची देशाला आणि राज्याला गरज आहे. त्यांनी पक्षाचं अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी त्यात अनपेक्षित असं काही नाही हे अलिकडच्या घडामोडींकडे बघून वाटतं”, असं संजय राऊत म्हणाले.

“शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तो कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याचं विश्लेषण तेच करु शकतात. पण त्यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुखांचा राजीनामा मागे घ्यावा लागला. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थित घेतात. शरद पवार यांनी तशा परिस्थित तो घेतला असेल”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत आणखी काय म्हणाले?

आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरु आहेत. त्यांचाच पक्ष गोंधळलेला आहे. त्यांच्याच पक्षाच्या आधारस्तंभाने राजीनामा दिला आहे. अशावेळी इतर पक्ष जाणं योग्य ठरणार नाही. या घडामोडींचा मविआवर काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद नेतृत्व शरद पवारच करतात. शिवसेना पक्ष जसा ठाकरे या नावावरच चाललेला, जिथे ठाकरे तिथे शिवसेना. त्याचपद्धतीने जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर काहीच भाष्य करणार नाही. फक्त त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करु शकतो. मी नक्कीच याबद्दल नंतर शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करु शकतो.

शरद पवार यांचं आज आत्मचरित्र पुस्तकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पवारांनी घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नंतर रोष व्यक्त केला. शरद पवार यांच्या या निर्णयाचा अंदाज त्यांच्या पत्नी प्रतिभा आणि मुलगी सुप्रिया यांनाही अंदाज नसेल. हे अचानक घडलं आहे. ही एक खेळी नसावी. हा एक भावनिक निर्णय आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.