‘देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी चटई घेऊन गेले आणि…’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर मिश्किल टिप्पणी केली आहे. संजय राऊत यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.

'देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी चटई घेऊन गेले आणि...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 5:02 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचा चांगलाच सिलसिला सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली होती. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही भेट ताजी असतानाच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीगाठींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मिश्किल शब्दांत टीकाही केली.

“देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणं हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. राज ठाकरे, त्यांचा पक्ष, भाजप, मिंदे गट हे त्यांचे व्यक्तीगत प्रश्न आहेत. ते वारंवार तिथे जात असतात. मी बातम्या पाहत असतो. उद्या देवेंद्र फडणवीस चटई घेऊन गेले आणि शिवतीर्थावरच मला राहायचं असे म्हणाले, तर तो त्यांचा प्रश्न आहे”, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊतांनी केली.

संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “उद्यापासून मी इथे आठ दिवस झोपणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर तो राज ठाकरेंचा प्रश्न आहे. या, राहा, बसा. येवा शिवतीर्थ आपलाच असा. त्यांचा प्रश्न आहे. शिवतीर्थवर कोणी जायचं, कोणी बसायचं. कुणी मेजवाणीला बोलवायचं हा त्यांचा प्रश्न आहे”. “सत्तेतील कुणाला भेटतात हा चर्चेचा विषय नाही. उद्या दुसरे कुणी मुख्यमंत्री झाले तर त्यांनाही शरद पवार भेटतील”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर भलेही बेकायदेशीरपणे एखादी व्यक्ती बसली असेल, सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री बेकायदेशीर आहेत, हे सरकार सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस केलं आहे. तरी ते बसले आहेत. निकाल लागेल. पण जोपर्यंत ते बसले आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांना मी भेटलो तर खळबळ माजेल’

“शरद पवार अनेक क्षेत्रात काम करतात. राजकारण हा वेगळा विषय, सहकार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्राशी संबंधित कामांसाठी कुणी मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्यामध्ये इतकी खळबळ माजण्याची गरज नाही. मी भेटलो तर खळबळ माजेल. आमच्या सारखे लोकं भेटली तर कदाचित प्रश्न निर्माण होईल की का भेटलात? आम्ही लपून भेटणारी लोकं नाहीत. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असतील. त्यात मला वाटत नाही की त्यामध्ये राजकारण आहे. त्यांनी या संदर्भात स्पष्ट खुलासा देखील केलेले आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सभागृहातील कामकाजांसाठी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटावच लागतं. शेवटी ते त्या खुर्चीवर बसलेले आहेत. ते नक्कीच त्या खुर्चीवरुन जातील. त्यांना जावं लागेल. पण ते जोपर्यंत त्या खुर्चीवर बसले आहेत तोपर्यंत त्या खुर्चीपुढे जावून उभं राहावंच लागतं. खुर्चीपुढे उभं राहावं लागतं, व्यक्तीपुढे नाही”, अशी भूमिका राऊतांनी मांडली.

भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटाल का?

भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटाल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी “मी कशाकरता भेटू? माझं काहीच काम नाही. मी गेल्या काही वर्षांपासून एकमेव असा माणूस आहे, ज्याचं सरकारकडे काहीच काम नसतं. माझ्या कामासाठी जी अनेक प्रश्न आहेत त्यासाठी सामना वृत्तपत्र आहे. मी समर्थ आहे. मी गेली 30 वर्षे मंत्रालयात गेलो नाही. माझं काही आडत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.