Tv9 Marathi Special Report | ठाकरे-फडणवीस ‘एकत्र’! महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानभवनात एकत्र आले आणि उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खरंच काही घडामोडी घडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Tv9 Marathi Special Report | ठाकरे-फडणवीस 'एकत्र'! महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार?
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:00 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानभवनात एकत्र आले आणि उलटसुलट चर्चा रंगल्या. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि फडणवीसांची सोबत विधान भवनात एंट्री झालीय. पण त्यावर उद्धव ठाकरे काय म्हणालेत? ते देखील महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात सोबत असल्याची दृश्यं फार बोलकी आहेत. विधिमंडळात प्रवेश करण्याचं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं टायमिंग एकच झालं. त्यामुळं दोन्ही नेते हसत हसत विधिमंडळात आलेत.

सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र आले. त्यामुळे विधीमंडळातच काय, महाराष्ट्रात चर्चा होणं स्वाभाविक होतंच. पण उद्धव ठाकरेंनी तर्क वितर्क लढवू नका म्हणत, राम राम आणि हाय हॅलो, इतकंच झाल्याचं म्हटलंय. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विधीमंडळात सोबत आले. पण राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर नकार देताच, बंद दाराआडवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाच.

2019च्या निवडणुकीआधी तत्कालीन भाजपचे अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर आले होते. त्यावेळी बंद दाराआड चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणाले. पण याच मुख्यमंत्रिपदावरुन फिस्कटलं आणि ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला. आता विधानभवनात, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची सोबत एंट्री झाल्यावर, उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. पण राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यावरुन ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांनीही इन्कार केलाय.

हे सुद्धा वाचा

योगायोग की वेगळी काही राजकीय रणनीती?

आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि फडणवीस विधान भवनात एकत्र आले त्यावरुन, राष्ट्रवादीनं शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय. शिंदे गटाला चिंता करण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणालेत. विधान भवनाच्या परिसरात असं चित्र होतं. तर विधान परिषदेत भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली. झाडाशी तुम्ही नातं तोडलं. पण कधी तरी विचार करा, असं सुधीरभाऊ म्हणालेत.

दुसरीकडे अपक्ष आमदार बच्चू कडूंनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. नेते कधीही एकत्र येतात. त्यामुळं तुम्ही आपसांत भांडू नका, असं बच्चू कडू म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येणं हा योगायोग असल्याचं खुद्द उद्धव ठाकरे म्हणालेत. सध्या तरी हा योगायोगच दिसतोय. राजकारणात तसं काही सांगता येत नाही. पण सध्याच्या स्थितीत पॅचअप कठीण दिसतंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.