BREAKING : धनुष्यबाण गेला, अखेर छातीवर दगड ठेवून ठाकरेंना घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) घडामोडींना वेग आलाय.

BREAKING : धनुष्यबाण गेला, अखेर छातीवर दगड ठेवून ठाकरेंना घ्यावा लागला 'हा' निर्णय
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 11:46 PM

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) घडामोडींना वेग आलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाचा निकाल समोर आल्यानंतर लगेच रात्री साडेआठ वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका मांडलेली. आपण निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर ठाकरे यांनी आज कलानगर चौकात जीपवर उभं राहून भाषण केलं. ठाकरे गटाच्या गोटात वेगवेगळ्या घडामोडी सुरु असताना एक आणखी मोठी बातमी समोर आलीय.

ठाकरे गटाने सोशल मीडियावर आपल्या पक्षाचं नाव बदललं आहे. ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आता नाव बदलण्यात आलं. ठाकरे गटाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाणाचा इतिहास नेमका काय?

शिवसेनेला धनुष्यबाणच चिन्ह म्हणून का ठेवावं वाटलं? याबद्दल अनेक मतं आहेत. त्यामागे 1968 मध्ये मुंबई महापालिकेच्या प्रचाराची एक कहाणी सांगितली जाते. असं म्हणतात की त्याकाळी प्रचारात हातात धनुष्यबाण धरलेली राम-लक्ष्मणाची जोडी चर्चेत होती. प्रचारातल्या याच जोडीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रातही छापून आल्या. त्या काळात असा प्रचार अनोखा होता. त्यातूनच शिवसेनेला चिन्ह म्हणून धनुष्यबाणाची कल्पना सूचली.

धनुष्यबाण शिवसेनेला 1989 साली मिळालं. त्याआधी शिवसेना जवळपास 6 वेगवेगळ्या निवडणुका धनुष्यबाणाच्या चिन्हाविना लढली. विशेष म्हणजे जी चिन्हं आज वेगवेगळ्या 6 पक्षांची आहेत. त्या सर्व चिन्हांवर शिवसेनेची कधीकाळी निवडणूक लढवून झालीय.

1970 मध्ये शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक उगवता सूर्य या चिन्हावर जिंकले. उगवत्या सूर्याचं चिन्हं आज डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कझगमचं आहे. मनोहर जोशी आणि सुभाष देसाईंनी कधीकाळी शिवसेनेकडून रेल्वे इंजिनवरही निवडणूक लढलीय. जे आज राज ठाकरेंच्या मनसेचं निवडणूक चिन्ह आहे.

1984 साली शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. तेव्हा जोशी आणि महाडिक भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. 1989 मधल्या एका निवडणुकीत शिवसेना कप-बशी चिन्हावरही लढली. जे चिन्ह गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीचं होतं.

1968 साली मुंबई महापालिकेत शिवसेना ढाल-तलवारीच्या निशाणीवर लढली. शिवसेना फुटीनंतर जे चिन्ह काही काळ शिंदे गटाला मिळालं होतं. 1985 च्या विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं भेटली. तेव्हा शिवसेनेत असलेले छगन भुजबळ मशाल चिन्हावर लढले. जे चिन्हं फुटीनंतर ठाकरे गटाला मिळालंय.

1988 आधी राजकीय पक्षांच्या चिन्हांबाबत ठोस धोरण नव्हतं. 1988 नंतर निवडणूक आयोगानं चिन्हांबाबतीत नवे नियम बनवले. त्याआधी शिवसेनेनं चिन्हासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र चिन्हासाठी आवश्यक मतांची टक्केवारी नसल्यामुळे शिवसेनेचे प्रस्ताव नाकारण्यात आले.

अखेर 1989 मध्ये शिवसेना-भाजपची युती झाली. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह बहाल केलं. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण ओळख बनली. तर वाघ हे शिवसेना या पक्षाचं चिन्ह म्हणून लोकप्रिय झालं.

धनुष्यबाण शिवसेनेच्या भात्यात येण्याआधी जितकी चिन्हं बदलली. तितकेच शिवसेनेचे राजकीय मित्रही बदलले. साल 1968. शिवसेनेची प्रजासमाजवादी पक्षासोबत युती होती. पुढे 1972 मध्ये शिवसेनेनं रा.सु.गवईंचा गट आणि मुस्लिम लीगसोबत युती केली आणि 1976 साली मुंबई महापालिकेत काँग्रेससोबतही शिवसेनेची युती राहिली. त्यानंतर शिवसेना भाजपसोबत दीर्घकाळ राहून 2019 काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली.

शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. आणि आता शिंदेंना मिळालेल्या शिवसेनेची युती भाजपसोबत आहे. मागच्या काही वर्षांच्या इतिहास पाहिला तर निवडणूक आयोगानं पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश वेळा मूळ पक्षाचं चिन्ह गोठवलंय. आणि चिन्ह आणि पक्षावर दावा करणाऱ्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह बहाल केलंय.

70 च्या दशकात काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस आणि दुसरा सिंडिकेट काँग्रेस अशी फूट पडली होती. तेव्हा काँग्रेसचं मूळ चिन्ह नांगर जुंपलेली बैलजोडी होतं. त्यावेळी निवडणूक आयोगानं मूळ बैलजोडी चिन्ह गोठवून इंदिरा गांधींच्या काँग्रेसला गाय-वासरुचं चिन्हं दिलं होतं. पुढे आणीबाणीमुळे पुन्हा काँग्रेस फुटली. गाय-वासरुच्या चिन्हावरुन वाद झाला. तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगानं गाय-वासरु हे चिन्ह गोठवलं. आणि इंदिरा गांधींनी काँग्रेसचं आत्ताचं म्हणजेच हाताच्या पंज्याचं चिन्ह निवडलं.

बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत पासवानांचा मुलगा आणि बंडखोर गट अशी फूट पडली होती. लोकजन शक्ती पार्टीचं मूळ चिन्ह झोपडी होतं, निवडणूक आयोगानं झोपडी चिन्हं गोठवलं. आणि पासवानांच्या मुलाला हेलिकॉप्टर तर बंडखोर घटाला शिवणयंत्राचं चिन्हं दिलं.

यावेळी महाराष्ट्राच्या केसमध्ये मात्र शिंदे गटाला नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाणही मिळालाय. ठाकरेंचे निम्म्यांहून जास्त आमदार-खासदार फुटले आहेत. आणि शिवसेना हे नाव आणि धनुष्यही ठाकरेंच्या हातून निसटलंय. इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे या नावापासून शिवसेना हे नाव वेगळं झालंय. त्यामुळे यापुढचा काळ उद्धव ठाकरेंसाठी सर्वाधिक आव्हानाचा असेल.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.