ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी, दोन गट कोणते?

या संभावित गटबाजीची दखल घेत काल उद्धव ठाकरे यांची चर्चा केल्याचं बोललं जातंय.

ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी, दोन गट कोणते?
मनीषा कायंदे, सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 11:29 PM

मुंबई – शिवसेनेतील महिला नेत्यांत गट तट पडल्याचं बोललं जातंय. काल एका उपनेत्या महिलेनं ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. या चर्चेतल्या गटबाजीची खुद्द उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्याची माहिती आहे. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश घेतला. त्यानंतर आता उपनेत्या आशा मिमाडी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. यानिमित्तानं ठाकरे गटामधील महिलांची नाराजी पुन्हा बाहेर येऊ लागली.

दीपाली सय्यद यांनी ठाकरे गट सोडताना थेट रश्मी ठाकरे यांच्याकडं बोट दाखविलं होतं. मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना आहे. निलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. या सर्वातील महत्तवाचा सुत्रधार रश्मी वहिनी असल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला होता.

उपनेत्या आशा मिमाडे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या मिना कांबळे यांच्याकडं बोट दाखविलंय. ठाकरे गट सोडण्याचं दुख होतं. मात्र, काही महिला नेत्यांकडून दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांचा आहे.

बाहेरचे गेलेले लोकं गद्दार नाहीत. मी गद्दार नाही. ह्या गद्दार आहेत. ही एक नंबरची खोटारडी बाई आहे. खोटं बोलणं तिला जमतं. चांगल्या साड्या कुणी दिल्या. दागिने कुणी दिले. कुणी बिर्यान्या पाठविल्या. कुणी कोंबडी वडे पाठविले. तेवढच खाऊन फस्त करणारी ती आहे.

ठाकरे गटातल्या महिला नेत्यांत गटबाजी सुरू झाल्याचं बोललं जातंय. एका गटात नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विशाखा राऊत यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात सुषमा अंधारे, रंजना घाडी आणि ज्योती ठाकरे यांचा समावेश आहे.

या संभावित गटबाजीची दखल घेत काल उद्धव ठाकरे यांची चर्चा केल्याचं बोललं जातंय. आपआपसातल्या स्पर्धेमुळं आपण चांगली माणसं गमावतोय. अशी भावना महिला नेत्यांच्या बैठकीत मांडल्याचं सांगितलं जातंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.