Ajit Pawar:राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव अजित पवारांमुळे? शरद पवारांनी फडणवीसांच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय?

अजित पवार आणि भाजपा यांच्यातील असलेले मधूर संबंध यापू्र्वीही महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. त्यानंतरही मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे अजूनही मनाने भाजपाशी जवळीक असलेले असल्याची चर्चा असते.

Ajit Pawar:राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव अजित पवारांमुळे? शरद पवारांनी फडणवीसांच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय?
Ajit Pawar and FadanvisImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:01 PM

मुंबई– राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena defeat)तिसऱ्या उमेदावाराचा पराभव होऊन दोन दिवस उलटले तरी यामागील राजकीय धुराळा मात्र अद्यापही खाली बसलेला नाही. आता या पराभवामागे पडद्यामागे उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit PAwar)तर नव्हते ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. ज्या संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार यांची मते फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे, हे दोघेही अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. देवेंद्र भुयार यांनीही गेल्या दोन दिवसांत याबाबत स्पष्टीकरणासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांची घेतलेली भेट, निधीबाबतचे वक्तव्य, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा आधार असल्याचे केलेले विधान हे सगळे अजित पवारांकडे संशयाची सुई नेणारेच असल्याचे मानण्यात येते आहे.

पवारांनी केलेल्या फडणवीसांच्या कौतुकाचा अर्थ

राज्यसभा निवडणुकीत आघाडीचा एका जागी पराभव झाल्यानंतर, शरद पवार यांनी यातून आपल्याला धक्का बसला नसल्याचे सांगितले होते. झालेला चमत्कार मान्य केला पाहिजे, फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसं आपलीशी करण्यात यश आलं आहे, असे त्यांनी म्हटले होते. यात त्यांचा रोख अजित पावरांकडे होता का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Political reporter post

Political reporter post

अजित पवारांचा पडद्यामागून भाजपाला पाठिंबा?

अजित पवार आणि भाजपा यांच्यातील असलेले मधूर संबंध यापू्र्वीही महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. त्यानंतरही मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे अजूनही मनाने भाजपाशी जवळीक असलेले असल्याची चर्चा असते. अशा स्थितीत फडणवीस यांच्या खेळीला पडद्यामागून अजित पवारांनी बळ दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

मविआ सरकारमधील मतभेद उघड

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही, शिवसेनेचे तिसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतील मतभेदही यानिमित्ताने समोर आल्याचे सांगण्यात येते आहे. अपक्ष उमेदवारांची जबाबदारी शिवसेनेकडे होती, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणातून अंग काढल्याचे सांगण्यात येत आहे. तर या पराभवानंतर नाराज असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत आघाडीतील प्रत्येक पक्षाने त्यांचे त्यांचे बघावे असे सांगितल्याची माहिती आहे. अपक्ष आमदारांची निधीबाबतची नाराजीही या निमित्ताने उघड झाली आहे.

अजित पवारांना राधाकृष्ण विखेंनी घातली साद

या सगळ्यात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अजित पवारांना पुन्हा भाजपासोबत येण्याचे आवाहन केले आहे. नगरमध्ये त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. एकूणच राज्यसभा निवडणुकांच्या निकालांनंतर राज्यातील राजकारण आगामी काळात बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसते आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.