Arvind Sawant : शिवसेनेला बदनाम करण्याचं काम होतेय, त्याला सडेतोड उत्तर देणार, मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक

अरविंद सावंत म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्यावर संजय राऊत हे प्रचंड हल्ले करीत होते. आम्हालाही याबाबत प्रतिहल्ले करणे गरजेचे आहे. मात्र भाषा सांभाळून वापरा, असा सल्ला पक्षप्रमुख यांनी दिला.

Arvind Sawant : शिवसेनेला बदनाम करण्याचं काम होतेय, त्याला सडेतोड उत्तर देणार, मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक
मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:17 PM

मुंबई : मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रवक्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर बोलताना अरविंद सावंत म्हणाले, आम्ही प्रवक्ते आहोत. हल्ली खूप खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आता काही पोपट झालेत. ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात. जाणीवपूर्वक मूळ मुद्द्यांला बगल देण्याचा प्रयत्न होतोय. राज्यपाल यांनी राज्याचा अपमान केला. सातत्याने ते असे करीत आहेत. सावित्रीबाई फुलेंबद्दल (Savitribai Phule) वादग्रस्त वक्तव्य केलं. घटनात्मक जागेवर बसलेल्या व्यक्तीनं जातींमध्ये दुही माजवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळं उभ्या महाराष्ट्रात (Maharashtra) असंतोष आहे. तो असंतोष असताना बातम्या आल्या. पण दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाली. ईडीनं धाड टाकली. राज्यपालांचा मुद्दा झाकण्याचा प्रयत्न झाला. याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाला, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.

भोंग्यांच्या विरोधात प्रतिहल्ले करणार

राज्यपालांबद्दलची महत्त्वाची बातमी झाकली गेली. सातत्याने काहीवेळा भोंगे बोलतात. घाणेरड्या शब्दात बोलतात. उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे वाईट शब्द भाजपला मान्य आहेत का, असा प्रश्न सावंत यांनी विचारला. अरविंद सावंत म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्यावर संजय राऊत हे प्रचंड हल्ले करीत होते. आम्हालाही याबाबत प्रतिहल्ले करणे गरजेचे आहे. मात्र भाषा सांभाळून वापरा, असा सल्ला पक्षप्रमुख यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांच्या पाठीत सुरा खुपसला

आमच्या पक्षाचे सवंगडी आमच्या पाठीत सुरा खुपसून गेले. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. तेव्हा महाराष्ट्र हळहळला. त्यासाठी नीतीमूल्ये लागतात, ती त्यांनी जपली. ठाकरेंसारख्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांच्या पाठीत सुरा खुपसला. साळवे साहेब मूळ प्रश्नाला बगल देतात. शेड्युल दहामध्ये पोलिटिकल पार्टीवर असते, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर पडदा

अरविंद सावंत म्हणाले, राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेला चीड येईल, असं वक्तव्य केलं. त्याविरोधात महाराष्ट्र पेटून उठला होता. परंतु, संजय राऊत यांना ईडीनं अटक केली. त्यामुळं राज्यपालांचा मुद्दा झाकला गेला, असा आरोप त्यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.