‘कोरोनाकाळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही’

जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. | Shivsena BJP Mumbai Mahanagarpalika election

'कोरोनाकाळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही'
किशोरी पेडणेकर, महापौर
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 2:53 PM

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवलं आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत, असे पेडणेकर यांनी म्हटले. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Mumbai Mahanagarpalika Election 2022)

त्या मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करत राहू दे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत टाकले जात आहेत. तिकडे मृत्यूचं तांडव सुरु असताना भाजपच्या नेत्यांना निवडणुकीची काळजी लागली आहे, असा टोलाही यावेळी किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव’

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

बई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेऊन शिवसेनेने पळवाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं सांगातनाच शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असे आशिष शेलार यांनी सांगितले. संबंधित बातम्या  

मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा आरोप

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप

(Mumbai Mayor Kishori Pednekar on Mumbai Mahanagarpalika Election 2022)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.