“हे दोन मुख्यमंत्री म्हणजे देश नव्हे”; उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे”; शिवसेनेच्या नेत्यानं ठाकरे गटाला त्यांची मर्यादा दाखवून दिली
पंजाब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्यावरही त्यांना छेडले असता देशातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत.
मुंबईः सध्या पुण्यातील पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळ सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे हा वाद आणखी विकोपाला पोहचला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातील चित्र काढायला हिम्मत लागते असं म्हणते शिवसेनेतील बंडखोर नेत्यांना डिवचण्याच प्रयत्न केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला नंतर आणि हिम्मत काढल्याने आता मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी सामनातील चित्र काढायला हिम्मत लागते, एकनाथ शिंदे ती हिम्मत कुठून आणणार असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला होता.
त्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. सहा महिन्यापूर्वीच आमची हिम्मत दाखवली आहे.
आणि एका आमदारामागे 50 आमदार आणि 13 खासदार असल्यानंतर ते जिगरबाज असणारच असं म्हणत शंभूराज देसाई यांनी आपलीही हिम्मत दाखवली आहे.
पंजाब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्यावरही त्यांना छेडले असता देशातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत.
त्यावर शंभूराज देसाई म्हणाले की, पंजाब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले म्हणजे काही देश नव्हे. त्यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पू्र्ण देश ओळखतो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साऱ्या जगाच ओळख असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी वेळोवेळी बेताल वक्तव्य करून त्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य करू नये असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे.