Sada Sarvankar: सदा सरवणकर यांच्या फोटोला काळे फासून, बॅनर फाडला; शिवसेनेचे बॅनर नव्याने लागले; मुंबईत शिवसैनिक आक्रमक

सदा सरवणकर यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले पोस्टर उतरून त्या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर आता पोस्टर वेगवेगळ्या ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

Sada Sarvankar: सदा सरवणकर यांच्या फोटोला काळे फासून, बॅनर फाडला; शिवसेनेचे बॅनर नव्याने लागले; मुंबईत शिवसैनिक आक्रमक
बंडखोरीमुळे सदा सरवणकर यांची पोस्टर्सला काळे फासून फाडलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:13 PM

मुंबई: शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक (Shivsainik) अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोर केल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा रोष व्यक्त केला. कोल्हापूरातही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून त्यांनी बंडखोर आमदारांबद्दल आपला राग व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे आता मुंबईतही शिवसैनिक आक्रमक होत, त्यांनी राग व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांचे पोस्टराला काळे फासून फाडण्यात आले आहे.

सदा सरवणकर यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले पोस्टर उतरून त्या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर आता पोस्टर वेगवेगळ्या ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

सदा सरवणकर गद्दार है

दादर माहीमचे असलेले सदा सरवणकर नुकताच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदार गटात सामील झाले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत सदा सरवणकर यांची वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले पोस्टरला काळे फासून ती फाडून टाकण्यात आली आहेत. यावेळी सदा सरवणकर गद्दार है च्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण तंग बनले होेत.

 देशद्रोही असल्याच्या घोषणा

सदा सरवणकर एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हे देशद्रोही असल्याचा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांचे बॅनर फाडून बॅनरला काळी फिती आणि काळेही फासण्यात आले आहे.

 शिवसैनिक आक्रमक

सदा सरवणकर हे मुंबईतील दादर-माहीम येथील शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबईतील शिवसेनेचे आमदार हे कट्टर असून ते उद्धव ठाकरेंची बाजू सोडणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र मुंबईतील पुन्हा तीन आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिक गुवाहाटीत गेल्यानंतर शिवसैनिक आक्रमक होते पोस्टरला काळे फासून फाडण्यास सुरूवात करण्यात आली आहेत.

दीपक लांडेंचेही पोस्टर फाडले

आता मुंबईतील अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांची पोस्टर फाडून त्या जागी आता बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पोस्टर्स आता वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. दीपक लांडे यांचीही पोस्टर्सला काळू फासून तीही पोस्टर्स फाडण्यात आली आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांबद्दल शिवसैनिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.