Sanjay Raut: शिंदे गट नाही गटार, संजय राऊतांचा धडाका सुरुच, बंडखोर कसे उत्तर देणार?
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief Minister Eknath Shinde)यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर दिल्लीतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी शिवसैनिक राऊत स्टाईलने उत्तर देत शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना भाजप (BJP) युतीचा शब्द […]
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief Minister Eknath Shinde)यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर दिल्लीतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी शिवसैनिक राऊत स्टाईलने उत्तर देत शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना भाजप (BJP) युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री होते मात्र शिवसेनेच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला असल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेत ज्यावेळी पत्रकारांनी शिंदे गटाविषयीचा सवाल उपस्थित केला गेला त्यावेळी पत्रकारांना मध्येच थांबवत खाससदा संजय राऊत म्हणाले की, तो गट नाही गटार आहे अशी जहरी टीका खासदार राऊत यांनी शिंदे गटावर केली.
शिंदे यांची खरी फसवणूक ही भाजप
यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी फसवणूक ही भाजपनी केली असल्याचेही त्यांनी जाहीररित्या सांगितले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीबाबत सांगताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आमची ज्यावेळी बैठक होत होती, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, आपले पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील मात्र त्यावेळी भाजपने पाठीत खंजीर खुपसला.
फुटीर गट हा स्वार्थी
खासदार संजय राऊत यांनी यावेळी त्यांनी सांगितले की, फुटीर गटाविषयी ज्यावेळी सवाल उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, फुटीर गट हा स्वार्थी असतो तो काय करतो किंवा काय निर्णय घेतो ते आपल्याला माहिती नाही, आणि त्याबद्दल आपल्याला सवाल विचारू नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेन अशा घटना खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या
यावेळी राजकारणात अशा घटना घडत असतात, आणि शिवसेनेन अशा घटना खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या असल्याचे सांगितले. यावेळी अशा घटनांना आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उत्तर द्यायचं असतं, आणि आम्ही अशा लोकांना उत्तर हे निवडणुकीच्या मैदानात देऊ असंही त्यांनी सांगितलं.