AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?

देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील हायवे दिवे येथे तयार झाले. श्री बागेश्वर मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेल्या श्री बागेश्वर बालाजी सनातन मठाचा लोकार्पण सोमवारी झाले.

मुस्लीम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात...धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?
Dhirendra Shastri
Follow us
| Updated on: Apr 15, 2025 | 12:20 PM

हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुस्लिम विरोधी नाही. या देशाने एपीजे अब्दुल कलाम यांना स्वीकारले. तसेच इतरांनाही स्वीकरले. परंतु आज भयप्रद वातावरणामुळे पश्चिम बंगालमधून हिंदू पलायन करीत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्ये करतील. पुढे मध्य प्रदेशमध्ये होईल. एका विशेष समुदायाकडून हिंदुना घाबरवण्याचे प्रयत्न येथील सरकारच्या मदतीने सुरू आहे, हे निंदनीय आहे. मुस्लीम या देशातील कायद्यात राहिले तर फायद्यात राहतील, असे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.

देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील हायवे दिवे येथे तयार झाले.  श्री बागेश्वर मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेल्या श्री बागेश्वर बालाजी सनातन मठाचा लोकार्पण सोमवारी झाले. यावेळी धीरेंद्र शास्त्री बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसाधारण गोरगरीब बागेश्वर बालाजी भक्तांना मध्यप्रदेश येथे जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम ही पर्वणी आहे. हे मठ सनातन धर्म प्रसाराचे केंद्र व भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान बनणार आहे, असे प्रतिपादन बागेश्वर बालाजी धामचे प्रमुख धोरेंद्र महाराज शास्त्री यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहे श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ

साडेचार एकर क्षेत्रफळावर मंदिराची रचना आहे. या ठिकाणी तळ मजला अधिक एक मजली आहे. मंदिराच्या पाठीमागच्या ठिकाणी यज्ञ शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर श्री बागेश्वर बालाजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बालाजींच्या उजव्या बाजूला गणरायाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला सफेद स्फटीकाचे शिवलिंग आहे. तसेच बालाजींच्या मूर्तीच्या समोरच प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंत स्वारीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तळ मजल्यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे बैठक व्यवस्थेचे तसेच छोट्या खाणी दिव्य दरबार सभागृह बनवण्यात आले आहे. या ठिकाणी रामायणातील विविध प्रसंगाचे चित्र रेखाटून रामायण दाखवण्यात आले आहे.

'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.