सीताराम कुंटेंनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार, कोण आहेत सीताराम कुंटे?
सीताराम कुंटे यांनी संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Sitaram Kunte Chief Secretary Of Maharashtra)
मुंबई : राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव कुंटे यांचे स्वागत करण्यात आले आहे.तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. नुकतचं सीताराम कुंटे यांनी संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Sitaram Kunte takes charge As a Chief Secretary Of Maharashtra)
राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी 1985 च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी (pravin pardeshi) यांची नावे चर्चेत होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीताराम कुंटे यांच्या नावाला पसंती दिल्यानं ते आता राज्याचे मुख्य सचिव झालेत. सीताराम कुंटे येत्या 9 महिन्यांपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहू शकतील, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये तेही सेवानिवृत्त होणार आहेत.
सुमारे 22 वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या 36 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. मंत्रिमंडळ बैठकीत श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत, तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना दिला निरोप. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks उपस्थित. pic.twitter.com/g4b48daDH7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 28, 2021
कोण आहेत सीताराम कुंटे?
भारतीय प्रशासन सेवेतील 1985 च्या तुकडीचे असलेले कुंटे हे मूळचे सांगली येथील आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए (अर्थशास्त्र) आणि एल.एल. बी पर्यंत झाले आहे. 1986 मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून काम पाहिले.
2012 मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरीक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्र शिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. 27 ऑगस्ट 2020 पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.
अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती
राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरीक्त कार्यभार होता. त्यानंतर ते वन विभागाचे सचिव झाले. महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. ऑक्टोबर 2010 मध्ये वन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली.
या सर्व महत्वाच्या पदांच्या जबाबदारी बरोबरच त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव, धुळे व बीडचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव, औरंगाबाद विभागाचे अतिरीक्त विभागीय आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव, मुंबई महापालिकेचे उपायुक्त, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, म्हाडाचे उपायुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. (Sitaram Kunte takes charge As a Chief Secretary Of Maharashtra)
संबंधित बातम्या :
मुख्य सचिवपदासाठी ‘बॅचमेट्स’मध्ये चुरस, सीताराम कुंटे-प्रवीण परदेशींमध्ये बाजी कोण मारणार?
मोठी बातमी! राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती