‘बेस्ट’च! बस स्टॉपवर सीसीटीव्हीची नजर, चार्जिंग पॉईंट अन्… मुंबईतील बस स्टॉप होणार हायफाय

नव्या रचनेसहित प्रवाशांच्या सेवेसाठी 200 बस थांब्यांचे सौंदर्य पूरक व नव्या रचनेसहित नुतनीकरण करण्यात येणार आहे.

'बेस्ट'च! बस स्टॉपवर सीसीटीव्हीची नजर, चार्जिंग पॉईंट अन्... मुंबईतील बस स्टॉप होणार हायफाय
मुंबईतील बस स्टॉप होणार हायफायImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 9:31 AM

मुंबई: मुंबईकरांसाठी (mumbaikar) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईतील सर्व बेस्ट स्टॉप (bus stop) कात टाकणार आहेत. मुंबईकरांना हायफाय सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने (BEST) कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या बेस्ट स्टॉपवर वायफाय सुविधेपासून ते चार्जिंगचीही सुविधा देण्यात येणार आहे. या शिवाय बस स्टॉपवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी बेस्ट प्रशासनाने काही बसस्टॉपची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली असून लवकरच या सुविधा बस स्टॉपवर देण्यात येणार आहेत.

बेस्ट स्टॉपवर प्रवाशांच्या सुविधेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, चार्जिंग पाईंट्स बसविण्यात येणार आहेत. या शिवाय अपंग व्यक्तींना चढ-उतार करण्यासाठी सोयीसुविधा देण्यात येणार आहे. थांबा परिसरात न घसरणाऱ्या लाद्या, ई-वाचनालय, बस येण्याची वेळ दाखवणारा डिजिटल बोर्ड बसवण्यात येणार आहेत. बस स्टॉपवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्टचे व्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

या सुविधा देण्यासाठी सुरुवातीला 10 बस थांब्याची निवड करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. बेस्ट उपक्रमाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

बस थांब्यांचा कायापालट करण्यात येत असून शहर व दोन्ही उपनगरातील बस थांबे पारदर्शक करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र आता बस थांब्यावर आलेल्या प्रवाशांना आंनदी वातावरणाचा अनुभव घेता यावा तसेच प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता बस थांब्यावर प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या रचनेसहित प्रवाशांच्या सेवेसाठी 200 बस थांब्यांचे सौंदर्य पूरक व नव्या रचनेसहित नुतनीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नव्या रचनेसहित प्रवाशांच्या सेवेसाठी 1 हजार बस थांब्याचे सौंदर्य पूरक व नव्या रचनेसहित नुतनीकरण करण्यात येणार आहे. सीएसआर धोरणाअंतर्गत दत्तक योजने योजनेनुसार 50 डिजिटल बसरांग आश्रय स्थानकांचे सामुदायिक नूतनीकरण हाती घेतले जाणार आहे.

बस थांब्यावर या मिळणार सुविधा

सीसीटीव्ही कॅमेरा दिव्यांग नागरिकासाठी सांकेतिक ब्रेल / सूचालन फलक न घसरणाऱ्या लाद्या रुंद बसराग मार्गिका सार्वजनिक शेअरिंग सायकलची सुविधा चार्जिंग व्यवस्था वायफाय बस आगमन निर्देशक रंगीत छत आरामदायक वातावरणासाठी प्रायोगिक क्षेत्रात धुके शीतकरण प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत पॅनिक बटन संगितासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा वाचनालय / ई-वाचनालय 360 अंशातील दृशमानतेसाठी कडक आणि अखंड काचेचे पटल प्रथमोपचार पेटी

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.