Mumbai | चेंबूरमध्ये स्नो-फॉल? छे… हा तर पावडर-फॉल्ट! काय आहे नेमकं प्रकरण?

विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली होती.

Mumbai | चेंबूरमध्ये स्नो-फॉल? छे... हा तर पावडर-फॉल्ट! काय आहे नेमकं प्रकरण?
चेंबूरमध्ये पावडर सदृष्य पाऊस
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 2:01 PM

मुंबई : मुंबईत (Mumbai) गारवा जाणवू लागला आहे. पण हिमवर्षाव व्हावा, इतकी काही परिस्थिती मुंबईत कधीच पाहण्यात आलेली नाही. अशातच स्नो-फॉल (Snow fall) सारखा भास होईल, अशा प्रकारचा अनुभव शनिवारी रात्री चेंबूरमधील (Chembur) काही लोकांना आला. पण हा स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट असल्याचं अखेर समोर आलं. यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहनही पोलिसांनी केलेलं आहे. दरम्यान, पावडर (Powder) सदृश्य पावसाचे घटक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचंही पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलंय.

चेंबूर

नेमकं काय घडलं?

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएलच्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली आहे. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली होती. पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली होती. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाक्यांवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.

घाबरण्याचं कारण नाही- पोलीस

दरम्यान, भयभीत झालेल्या लोकांनी लगेचच पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड, स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाची माणसं तत्काळ दाखल झाली. त्यांनी या सगळ्याची प्राथमिक पाहणी करुन नेमकं असं कशामुळे झालंय, याचा शोध घेतला. तेव्हा एचपीसीएलच्या एका प्लांटमधून कॅटालिस्ट पावडरची गळती झाल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलं. दरम्यान, ही पावडर विषारी नसल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली. तरिही खबरदारी म्हणून या पावडरची चाचणी केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. तसंच गळतीबाबत जर हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीवर कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे कंपनीनं झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ – 

इतर बातम्या – 

Surprising | जाळं टाकलं माशांसाठी, गळाला लागले चक्क असंख्य आयफोन!

Nagpur Accident CCTV | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

लघवीला गेलेल्या पाहुणीवर अंधारात काळ, जंगलात नेऊन सहा नराधमांचा बलात्कार; सर्व आरोपींना अखेर जन्मठेप

Video : या दिव्यांग व्यक्तीच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा व्हायरल व्हिडीओ जिंकेल तुमचंही मन

Sarangkheda| आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी…मधुलिका कुलीन रुबीची उंची 63 इंच, किंमत 33 लाख…!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.